×

गंगूबाई काठियावाडी सिनेमातील ‘झुमे रे गोरी’ गाण्यात पारंपरिक गुजराती लूकमध्ये आलिया भट्ट केला धमाकेदार गरबा

अभिनेत्री आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. आज (२५ फेब्रुवारी) रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाला असून, या सिनेमाकडून बॉलीवूडला आणि प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत. या सिनेमाची घोषणा झाली तसा हा सिनेमा सतत प्रेक्षक आणि कलाकारांच्या चर्चेत येत आहे. हा सिनेमा चर्चेत येण्याची मुख्य कारणं म्हणजे, आलिया भट्ट, संजय लीला भन्साळी, चित्रपटाचा विषय. संजय लीला भन्साळी आणि वाद हे जणू मागील काही काळापासून समीकरण बनले आहे. ते सिनेमा बनवणार त्यावर वाद होणार नाही असे घडतच नाही. मात्र हा सिनेमा आज जरी वेगवगेळ्या वादांमध्ये अडकला असला, तरी चित्रपटाला घेऊन प्रेक्षकांमध्ये खूपच मोठी उत्सुकता आहे. आलिया भट्टला वेगळ्या भूमिकेत बघणे ही तिच्या चाहत्यांसाठी एक पर्वणीच आहे. या सिनेमाचा ट्रेलर आणि प्रदर्शित झालेली गाणी तुफान गाजताना दिसत आहे. आता या सिनेमातील नवीन गाणे ‘झुमे रे गोरी’ प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्यात आलिया भट्टचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळत असून, गाणे एक टिपिकल गरबा सॉन्ग आहे.

या गाण्यात आलिया भट्टचा एक पारंपरिक गुजराती लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत असून, तिने घातलेला काळ्या आणि मरूण रंगाचा घागरा देखील सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या घागऱ्यावर तिने सिल्वर रंगाची ज्वेलरी घातली असून, केस मोकळे सोडले आहे. या गाण्यावर ती खूपच सुंदर असा गरबा करत असून, तिच्या ग्रेसफुली डान्स सर्वांच्याच पसंतीस पडत आहे. हे गाणे बघताना आपल्या संजय लीला भन्साळी यांच्या इतर सिनेमातील गाणी देखील काही क्षण आठवल्याशिवाय राहत नाही. रामलीला सिनेमातील ढोल बाजे गाण्याचीच झलक या गाण्यात दिसते. कुमार यांनी लिहिलेल्या या गाण्याला संजय लीला भन्साळी यांनी संगीत दिले असून, अर्चना गोरे, तरन्नुम मलिक जैन, दीप्ती रेगे आणि अदिती प्रभुदेसाई यांनी या गाण्याला स्वरबद्ध केले आहे. तर कृती महेशने हे गाणे कोरिओग्राफ केले आहे. सध्या या गाण्यावर प्रेक्षकांच्या खूपच चांगल्या प्रतिक्रिया येत असून, गाण्यातील आलियाचा डान्स सर्वांनाच आवडला आहे.

तत्पूर्वी गंगुबाई काठियावाडी सिनेमाचा प्रीमियर ७२ व्या बर्लिन फिल्म फेस्टिवलमध्ये झाला. गेल्या काही दिवसांपासून ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटातील काही दृश्य, नाव, इंटिमेट सीन यावरुन वाद निर्माण झाला होता. अनेकांनी याबाबत न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने या सर्व याचिका फेटाळल्या असल्याने या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या मार्गातील सर्व अडचणी दूर झाल्या आहेत. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘गंगूबाई काठियावडी’ हा चित्रपट मुंबईतील कमाठीपुराच्या माफिया क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगूबाई यांच्या जीवनावर आधारित आहे.

हेही वाचा –

Latest Post