चित्रपटसृष्टीतील चाॅकलेट बाॅय आणि उत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणजे रणबीर कपूर. एका पेक्षा एक दमदार सिनेमे करणारा रणबीर आजच्या पिढीतील आघाडीचा अभिनेता आहे. सध्या बॉलिवूडमधील अनेक मोठमोठे कलाकार डिजिटल माध्यमांना मिळणारी लोकप्रियता आणि प्रसिद्धी पाहून याकडे वळताना आपण बघत आहोत. त्यातच आता अशी बातमी येत आहे की, रणबीर कपूर देखील लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. माध्यमातील वृत्तानुसार, रणबीर ‘इरोज नाऊ’ सोबत हात मिळवत,डिजिटल प्लॅटफॉर्मवर एन्ट्री मारणार आहे. ‘इरोज नाऊ’च्या एक सुंदर आणि आकर्षक लव स्टोरीत काम करणार असून, या प्रेमकथेचा मार्फत तो डिजिटलवर धमाकेदार पदार्पण करणार आहे. दरम्यान, रणबीरचा एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यात तो नेहमीप्रमाणे खूपच हँडसम दिसत आहे.
व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये रणबीरने फ्लोरल प्रिंटेड ब्राऊन शर्ट घातला असून, फोटोच्या मागचे बॅकग्राउंड देखील फुलांचेच दिसत आहे. शिवाय त्याने आरशावर हात ठवल्याने त्याचे प्रतिबिंब त्या आरशात अधिकच स्पष्ट उठावदार दिसत आहे. हा फोटो ‘जी क्यू’ या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला असून, हा फोटो शेअर करताना लिहीले आहे की, “रणबीर कपूर काय विचार करत आहे? ओवर टू यू.” सोशल मीडियावर रणबीरचा या फोटोतील स्मार्ट आणि इंटेंस लूक प्रचंड आवडला असून तशा कमेंट्सही त्यावर येत आहेत. रणबीर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. त्याला सोशल मीडियावर मिलियन मध्ये फॉलोवर्स असून, ते नेहमीच त्याच्या पोस्टची वाट बघत असतात.
रणबीर अभिनेत्री आलिया भट्टला डेट करत असून मागील तीन वर्षांपासून हे दोघे रिलेशनशिपमध्ये आहे. रणबीर आणि आलियाच्या रिलेशनशिपची नेहमीच सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असते. अजूनपर्यंत या दोघांनी त्यांचे नाते अधिकृतरीत्या मीडियासमोर किंवा सार्वजनिक ठिकाणी स्विकारले नसले तरी त्यांच्या प्रत्येक गोष्टीतून एकमेकांबद्दल व्यक्त होणारे प्रेम नेहमीच दिसते. ते दोघे इंस्टाग्राम अकाऊंटवरून एकत्र फोटो शेअर करताना दिसतात. त्यांच्या डोळ्यात एकमेकांबद्दल असलेले प्रेम नेहमीच स्पष्ट होताना दिसत असते.
रणबीर कपूरच्या कामाविषयी बोलायचं झालं, तर तो लवकरच अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात आलिया भट्टसोबत दिसणार आहे. रणबीर आणि आलिया व्यतिरिक्त या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि मौनी रॉय देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय रणबीर कपूर ‘एनिमल’ मधून एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यांचे चाहते या दोन्ही चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘एकेकाळी टॅक्सीमध्ये बसणे अभिमानाची गोष्ट होती’, अनिल कपूर यांनी ‘त्या’ दिवसांची काढली आठवण
-तब्बल ३० वर्षानंतर अजय देवगणने रिक्रिएट केला त्याचा ‘सिग्नेचर स्टंट’; ट्रकवर केली जबरदस्त ऍक्शन