Friday, April 18, 2025
Home नक्की वाचा कामाप्रती अतिशय शिस्तबद्ध असलेल्या ऋषी कपूर यांच्याबद्दल त्यांच्या लेकाने सांगितली खास आठवण

कामाप्रती अतिशय शिस्तबद्ध असलेल्या ऋषी कपूर यांच्याबद्दल त्यांच्या लेकाने सांगितली खास आठवण

ऋषी कपूर (Rishi Kapoor)  हे बॉलिवूड जगतातील सर्वात यशस्वी अभिनेते म्हणून ओळखले जातात. ८०, ९० च्या दशकात त्यांच्या अभिनयाने प्रत्येकालाच वेड लावले होते. त्या काळात त्यांच्यासोबत अभिनय करायला प्रत्येक अभिनेत्री उत्सुक असायची. प्रत्येक भूमिकेत जिवंतपणा आणणे त्यांच्या अभिनयाचे विशेष कौशल्य होते. त्यामुळेच त्यांच्या अभिनयाची आजही चर्चा होताना दिसते. त्यांच्याबद्दलचे अनेक किस्से ऐकायला मिळतात. असाच एक किस्सा अभिनेता रणबीर कपूरने (Ranbir Kapoor)  सांगितला होता. काय होता हा किस्सा चला जाणून घेऊ. 

ऋषी कपूर यांच्या मृत्यूने संपूर्ण सिनेजगताला मोठा धक्का बसला होता. आपल्या अभिनयाने हिंदी सिनेजगतातील पहिले चॉकलेट बॉय अशी ओळख मिळवलेल्या ऋषी कपूर यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटात काम केले. ऋषी कपूर यांनी त्यांच्या शेवटच्या चित्रपटाचे म्हणजेच ‘​​शर्माजी नमकीन’चे शूटिंग मध्येच सोडले. वडिलांच्या शेवटच्या चित्रपटाचे प्रमोशन करताना अभिनेता रणबीर कपूरने ऋषी कपूर यांच्याशी संबंधित अशा काही आठवणी सांगितल्या, ज्या ऐकल्यानंतर प्रेक्षकांना पुन्हा एकदा ऋषी कपूरची आठवण झाली. ऋषी कपूर त्यांच्या कामाबद्दल किती गंभीर होते हे चांगलेच माहीत आहे. असाच एक किस्सा रणबीरने ऋषी कपूरच्या चाहत्यांशी शेअर केला आहे.

Ranbir Kapoor & Rishi Kapoor
Photo Courtesy Instagramneetu54

कामाबाबत वडील ऋषींच्या या सवयीवर रणबीरने सांगितले की, “माझी आई खूप रागावायची, कारण ते खूप दिवस घरी नसायचे. बाबा आईला त्रास द्यायचे. अशा परिस्थितीत माझी आई ऋषी कपूर यांना रागाच्या भरात आरके स्टुडिओत पाठवत असे आणि त्यांना तिथे बसायला सांगायची.” रणबीर कपूरने वडिलांशी संबंधित या आठवणी पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर आणल्या आहेत. ऋषी कपूरचे चाहते आजही त्यांना खूप मिस करताना दिसतात. त्यामुळे आजकाल नीतू कपूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये नीतू कपूर असे म्हणताना दिसत आहे की, ‘कोणीतरी तिला ऋषी कपूरची आठवण करून देत आहे’.

Neetu Kapoor & Rishi Kapoor
Photo Courtesy Instagramneetu54

वडील ऋषी यांच्या चित्रपटाचे प्रमोशन करत असताना रणबीर कपूरने मीडियाला सांगितले होते की, “त्याचे वडील कामामुळे खूप दिवस घरी यायला विसरायचे. ज्यामुळे आई नीतू कपूर रागावत असे.” दरम्यान लोकप्रिय अभिनेते ऋषी कपूर यांंनी बॉबी, चांदनी, दिवाना, अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. चांदनी चित्रपटात अभिनेत्री श्रीदेवीसोबतची त्यांची केमिस्ट्री चांगलीच गाजली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा