मित्राच्या गर्लफ्रेंडसोबत घालवली रात्र? होकार देत रणबीर कपूर म्हणाला…

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) बॉलिवूडचा आवडता अभिनेता आहे. त्याच्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धमाल केली आहे. पण रणबीर त्याच्या रील लाईफपेक्षा त्याच्या खऱ्या आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे. त्याच्या अफेअरपासून ते को-ऍक्टरसोबतच्या नात्यापर्यंत तो रोजच चर्चेत असतो. एक काळ असा होता, जेव्हा त्याला ‘दिलफेक आशिक’ म्हणून पाहिले जात होते. इतकेच नव्हे, तर त्याच्या एक्स गर्लफ्रेंडनेही त्याच्यावर फसवणूक केल्याचा आरोप केला होता.

मित्राच्या गर्लफ्रेंडसोबत घालवली रात्र
आलिया भट्टमुळे (Alia Bhatt) रणबीर कपूर आता सोशल मीडियाचा चर्चेचा विषय बनला आहे. अभिनेत्रीसोबतचे त्याचे फोटो अनेकदा व्हायरल होतात. पण तुम्हाला माहित आहे की, रणबीर कपूरने त्याच्या मित्राच्या गर्लफ्रेंडसोबत रात्र घालवली आहे आणि त्याने स्वतः एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, पण रणबीरने हे केले आहे आणि नॅशनल टीव्हीवरही त्याने हे मान्य केले आहे. (ranbir kapoor spent night with friends girlfriend actor revealed the truth)

करण जोहरच्या शोमध्ये केले कबूल
रणबीर कपूर हे चित्रपट जगतातील एक मोठे नाव आहे. रणबीर कपूरचे वैयक्तिक आयुष्य चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. त्याने आपल्या फिल्मी करिअरमध्ये आतापर्यंत अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना डेट केले आहे. या यादीत दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि कॅटरिना कैफसारख्या (Katrina Kaif) प्रसिद्ध अभिनेत्रींच्या नावांचा समावेश आहे. करण जोहरच्या (Karan Johar) ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये रणबीर कपूरने याची कबुली दिली होती.

आलिया भट्टसोबत आहे रिलेशनशिपमध्ये
या शोदरम्यान करण जोहरने रणबीर कपूरला विचारले की, “तू तुझ्या मित्राच्या गर्लफ्रेंडसोबत रात्र घालवली आहेस का?” तेव्हा रणबीर कपूरने उत्तर देण्यास उशीर केला नाही आणि लगेचच ‘हो’ म्हटले. रणबीर कपूर सध्या बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टला डेट करत आहे. दोघे लवकरच लग्न करू शकतात, असे बोलले जात आहे. त्यामुळे आजच्या काळात त्यांची सर्वत्र चर्चा होत आहे.

रणबीर कपूरचे चित्रपट
रणबीर कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, लव रंजनच्या चित्रपटाव्यतिरिक्त, रणबीर कपूर यशराज फिल्म्सच्या ‘शमशेरा’ आणि अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’मध्ये दिसणार आहे. ब्रह्मास्त्रमध्ये आलिया पहिल्यांदाच रणबीरसोबत दिसणार आहे. या चित्रपटाचा टीझर आधीच समोर आला आहे, ज्याला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. लव रंजनच्या चित्रपटात रणबीरची जोडी पहिल्यांदाच श्रद्धा कपूरसोबत दिसणार आहे.

हेही वाचा :

Latest Post