Monday, February 26, 2024

रणदीप हुडाने शेअर केले लग्नाच्या रिसेप्शनचे फोटो, पारंपारिक पोशाखात नवविवाहित जोडप्याने वेधले लक्ष

अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep hudda) 29 नोव्हेंबर रोजी त्याची गर्लफ्रेंड लिन लैश्रामसोबत विवाहबद्ध झाला. आता या जोडप्याने त्यांचे कुटुंब आणि मित्रांसाठी एक भव्य रिसेप्शन आयोजित केले आहे.

रणदीप हुड्डाने मुंबईत त्याच्या लग्नाचे रिसेप्शन आयोजित केले होते, ज्याची काही छायाचित्रे अभिनेत्याने त्याच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहेत. त्याच्या कॅप्शनमध्ये रणदीपने लिहिले- ‘मीपासून आता आम्ही बनलो.’

त्यांच्या लग्नाप्रमाणेच त्यांच्या रिसेप्शनमध्येही हे जोडपे अतिशय पारंपारिक शैलीत दिसले. यावेळी रणदीपने गोल्डन आणि व्हाइट शेरवानी परिधान केली होती. दरम्यान, त्याची वधू लिन सोनेरी रंगाच्या साडीत अप्सरासारखी दिसत होती.

यादरम्यान हे जोडपे कपाळावर टिळक लावताना दिसले. दोघांचा हा लूकही लग्नासारखाच वेगळा होता. रणदीप आणि लिनच्या या फोटोमध्ये दोघेही स्टेजवर उभे असल्याचे दिसत आहे. त्याचवेळी एक खास महिला त्याला काही खास गोष्टी सांगताना दिसत आहे.

रणदीपची पत्नी लिन ही मणिपूरची रहिवासी आहे.रणदीपने लिनच्या घरी लग्न केले आणि तिथल्या पारंपारिक मैताईमध्ये त्याच्या लग्नाचे विधी पार पाडले. या जोडप्याच्या लग्नातील साधेपणा आणि लिनने तिच्या पतीबद्दल दाखवलेला आदर चाहत्यांना आवडला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘ऍनिमल’ 24 तास कधीही पाहू शकता, रात्री 2 नंतर आणि पहाटे 5 पासून मुंबईमध्ये शो सुरु
‘सीआयडी’ फेम फ्रेडरिक्स व्हेंटिलेटरवर, हृदयविकाराचा झटक्याने लढतोय जीवन-मरणाची लढाई

हे देखील वाचा