Saturday, March 2, 2024

रणदिप हुड्डा वेगळ्या पद्धतीने देणार शहीदांना श्रद्धांजली,शहीद दिवशी रिलीज होणार ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’

बाॅलिवूड अभिनेता रणदिप हुड्डा सध्याला त्याचा आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘स्वतंत्र्यवीर सावरकर ‘ असं या चित्रपटाचं नाव आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त रणदीपने त्याचा चित्रपट ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’चा टीजर शेअर केला होता. त्याचसोबत आता या चित्रपटाची रिलीज डेटही पुढे आली आहे. रिलीज डेटसोबतंच निर्मात्यांनी या चित्रपटाचा अजुन एक टीजरदेखील शेअर केला आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हा बायोपिक राष्ट्रिय शहीद दिवसाला भारतीय सशस्त्र संघर्षाच्या शहीदांना श्रद्धांजली देणार आहे. हा चित्रपट 22 मार्च 2023ला रिलीज होणार आहे. हा चित्रपट हिंदीसोबतंच मराठी भाषेतही चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी तयार असल्याचेही समोर आले आहे. या चित्रपटात मुख्य भुमिकेत रणदिप हुड्डा दिसणार आहे. विशेष म्हणजे रणदिप अभिनयासोबतंच या चित्रपटातुन दिग्दर्शनातही पदार्पण करणार आहे.

काय आहे टीजर
टीजरची सुरुवात वीर सावरकरांच्या भुमिकेत असणाऱ्या रणदीप हुड्डाच्या फोटोपासून होते.टीजरमध्ये रणदिप म्हणते,’मी गांधींचा तिरस्कार करत नाही, परंतु अहिंसेचा करतो.’ इंस्टाग्रामवर टीजर शेअर करत अभिनेत्याने कॅप्शन लिहिले आहे, “भारतीय स्वतंत्र्य संग्रामाचे दोन नायक, एकाने उत्सव साजरा केला आणि एकाचं नाव इतिहासातुन काढून टाकलं गेलंं. 2024 च्या शहीद दिवशी म्हणजेच 22 मार्च 2024ला ‘ चित्रपटगृहात स्वतंत्र्यवीर सावरकर’ सोबत इतिहास पुन्हा लिहिला जाईल ”

चित्रपटाविषयी बोलताना रणदिप हुड्डा म्हणाला,’श्री सावरकरांसोबत काळ्या पाण्यात जवळजवळ दोन वर्ष घालवल्यावर शेवटी त्यांच्यासाठी स्वतंत्र्याच्या दिशेने पाऊल टाकायची वेळ आली आहे. ही प्रवास खुप कठीण होता. परंतु याने मला एक अभिनेत्याच्या रुपात स्वतःहुन पुढे जावुन एक चित्रपट निर्माता बनण्यासाठी प्रेरित केलं आहे. देशाला आपल्या स्वतंत्र्य संग्रामात सशस्त्र क्रांतीच्या योगदानाबद्दल लोकांना सांगण्याची, आता वेळ आली आहे. श्री सावरकर नेहमीच वेळेच्या पुढे होते,आणि आज आधीपेक्षा कितीतरी जास्त संबंधित आहे.’

या चित्रपटाची निर्मीती झी-स्टुडियोज, आनंद पंडित, रणदिप हुड्डा, संदिप सिं आणि योगेश राहर यांच्याद्वारे केली गेली आहे. तसेच रूपा पंडित, सॅम खान, अनवर अली, पांचाली चक्रवर्ती या चित्रपटाचे सह-निर्माते आहेत. चित्रपटात रणदिपसोबत अंकिता लोखंडे आणि अमित सियालदेखील मुख्य भुमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 22 मार्च 2024ला हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-
रश्मिका मंदानाने पूर्ण केली ‘छावा’ची शूटिंग; विकी कौशलचे कौतुक करत म्हणाली, जगात कोणीही विचार केला नसेल…’
सिद्धूच्या कॉमेडीने भरलेल्या ‘लग्नकल्लोळ’चा धमाकेदार टिझर प्रदर्शित, पाहा व्हिडिओ

हे देखील वाचा