Wednesday, March 12, 2025
Home बॉलीवूड राणू मंडलने केली सलमान खानसोबत जुगलबंदी, मजेशीर व्हिडिओ झाला सोशल मीडियावर व्हायरल

राणू मंडलने केली सलमान खानसोबत जुगलबंदी, मजेशीर व्हिडिओ झाला सोशल मीडियावर व्हायरल

सोशल मीडिया हे आता असे एक व्यासपीठ बनले आहे, जिथे कोणताही कलाकार त्याचे कौशल्य दाखवू शकतो. अशीच एकदा राणू मंडल (Ranu Mandal) नावाची स्त्री रातोरात स्टार बनली. रेल्वे स्टेशनवर ती गाणे गात होती त्यावेळी तिचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि जेव्हा हिमेश रेशमियाने (himesh reshmia) तो व्हिडिओ पाहिला तेव्हा त्याने त्याला चित्रपटात गाण्याची संधीही दिली. त्यामुळेच सोशल मीडियावर कोणाचे नशीब कधी चमकते, हे सांगता येत नाही. आता रेणू मंडलचा सलमान खानसोबतचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोघांची जुगलबंदी लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणत आहे.

रानू मंडल आणि सलमान खानचा (salman khan) एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही १९५८ मध्ये आलेल्या ‘चलती का नाम गाडी’मधील ‘हाल कैसा है जनाब का’ हे सुपरहिट गाणे गाताना दिसत आहेत.

जर तुम्‍हाला हा व्हिडिओ खरा मानत असाल, तर आम्‍ही तुम्‍हाला सांगतो की दोघांचे वेगवेगळे व्हिडिओ एडिट करून तो एक बनवला गेला आहे. सोशल मीडियावर अनेकदा माईम्स आणि मजेदार फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्यक्तींनी सलमान खान आणि रानू मंडलचे दोन वेगवेगळे व्हिडिओ मिक्स करून सोशल मीडियावर शेअर केले.

व्हिडिओ अशाप्रकारे एडिट करण्यात आला आहे की, सलमान खान ‘हाल कैसा है जनाब का’ चे पुरुष व्हर्जन गाताना दिसत आहे आणि रानू मंडल महिला व्हर्जन गाताना दिसत आहे. २०२० मध्ये realfascinated च्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्यावर लोक खूप कमेंट करत आहेत.

व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘सलमान भाई.. पृथ्वी बरी होत आहे. हाल कैसा है जनाब का… सलमान खान आणि रानू मंडल. चांगले शेअर करा, माझे करिअर खराब होणार नाही.” मूळ गाणे किशोर कुमार  (kishor kumar) आणि लता मंगेशकर (lata mangeshkar) यांनी गायले होते, तर गाणे एसडी बर्मन (S. D. barman) यांनी संगीतबद्ध केले होते. हे गाणे त्याच्या काळातील सुपरहिट गाणे होते, जे आजही लोकांना आवडते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा