बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी लग्नाच्या सहा वर्षांनंतर त्यांच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. फेब्रुवारी महिन्यात, या जोडप्याने जाहीर केले की, ते लवकरच आई वडील होणार आहेत. ही बातमी समोर येताच दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव झाला. त्याच वेळी, या पॉवर कपलशी संबंधित प्रत्येक अपडेट समोर येत आहे. अशातच रणवीर सिंगच्या आगामी शेड्यूलबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग या वर्षाच्या अखेरीस त्यांच्या बाळाचे स्वागत करणार आहेत. अशातच रणवीरने दीपिका आणि त्यांच्या बाळासोबत वेळ घालवण्यासाठी कामातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. माध्यमातील वृत्तानुसार दीपिकाने तिचे सगळे काम पूर्ण केले आहे. त्याचप्रमाणे रणवीर देखील नंतर कोणतेही प्रोजेक्ट हाती घेणार नाही अशी माहिती समोर आलेली आहे. जेणेकरून त्याला दीपिका आणि त्याच्या बाळासोबत जास्तीत जास्त वेळ घालवता येईल.
2 मार्च 2024 रोजी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनच्या दुसऱ्या दिवशी, दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी परफॉर्मन्स दिला. ‘दिल धडकने दो’ चित्रपटातील ‘गल्लन गुडियां’ या गाण्यावर तिने डान्स केला. 29 फेब्रुवारी 2024 रोजी दीपिका आणि रणवीरने लवकरच आई-वडील होणार असल्याच्या बातमीने त्यांच्या चाहत्यांना आनंद दिला.
दीपिका-रणवीरने त्यांच्या वैयक्तिक इंस्टाग्राम अकाऊंटवर एकत्र एक फोटो पोस्ट शेअर केला आहे. फोटोमध्ये निळ्या आणि गुलाबी रंगात लहान शूज, टोपी, बूट आणि फुगे आहेत, त्यामुळे त्यांना जुळे असण्याच्या शक्यतेबद्दल चाहत्यांमध्ये अंदाज लावला आहे. तसेच त्यांच्या बाळाचा जन्म सप्टेंबर महिन्यात होणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग ‘राम लीला’ चित्रपटादरम्यान एकमेकांच्या जवळ आले होते. यानंतर दोघांनी 14 नोव्हेंबर 2018 रोजी इटलीमध्ये लग्न केले. दीपिका-रणवीरने इटलीतील लेक कोमो येथील 700 वर्षे जुन्या व्हिला डेल बाल्बियानेलो येथे कोंकणी आणि नंतर सिंधी पद्धतीने लग्न केले.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
…म्हणून विक्रांत मेस्सीने मागितली सारा अली खानची माफी, मोठे कारण आले समोर
‘शक्तिमान’मध्ये रणवीर सिंगच्या कास्टिंगवर भडकले मुकेश खन्ना; म्हणाले, ‘तो असेल मोठा स्टार पण…’