‘शक्तिमान’ हा लोकप्रिय सुपरहिरो शो टेलिव्हिजनवर बराच काळ पाहिला गेला आणि प्रेक्षकांना खूप आवडला. ‘शक्तिमान’ची भूमिका ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांनी साकारली होती. या व्यक्तिरेखेची लोकप्रियता पाहून त्याला मोठ्या पडद्यावर आणण्याची योजना आखण्यात आली आणि चित्रपटाच्या घोषणेपासून ते चर्चेत आहे. दरम्यान, या चित्रपटात रणवीर सिंग ‘शक्तिमान’ची भूमिका साकारणार असल्याची बातमी समोर आली आहे. मात्र आता या भूमिकेत रणवीरला कास्ट केल्याने मुकेश खन्ना भडकले असून, त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे, त्यानंतर त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
मुकेश खन्ना यांनी नुकतीच आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आणि लिहिले की, “रणवीर कितीही मोठा स्टार असला तरी तो शक्तीमानची नैतिक मूल्ये कधीही स्वीकारू शकणार नाही.” मुकेश यांनी लिहिले की, “सोशल मीडियावर अनेक महिन्यांपासून ही अफवा पसरली होती की रणवीर हा चित्रपट करणार आहे आणि प्रत्येकजण त्याबद्दल संतापला होता.”
मुकेशने पुढे लिहिले की, “या चर्चेनंतरही मी गप्प राहिलो, पण जेव्हा चॅनल्सने रणवीरला साइन केल्याची घोषणा सुरू केली. त्यामुळे मला सांगावे लागले की अशी प्रतिमा असलेला माणूस कितीही मोठा स्टार असला तरी तो शक्तीमान होऊ शकत नाही. यानंतर मी माझी पावले मागे घेतली. आता बघूया पुढे काय होते?”
मुकेश खन्ना यांनी त्यांच्या यूट्यूबवर एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी काही काळापूर्वी रणवीर सिंगच्या प्रसिद्ध फोटोशूटचा उल्लेख केला होता. मुकेश म्हणाले, ‘त्यांनी इतर देशांचा शोध घ्यावा जिथे नग्नतेबाबत कोणालाच अडचण नाही. फिनलंड सारखे, स्पेन सारखे. तिथे तुम्ही अशा चित्रपटांमध्ये काम करता, जिथे तुम्हाला प्रत्येक तिसऱ्या सीनमध्ये न्यूड सीन करायला मिळेल.
व्हिडिओमध्ये मुकेश पुढे म्हणाले, ‘मी भारतीय मूल्ये आणि सांस्कृतिक सीमा जपण्यात विश्वास ठेवतो. शक्तीमानच्या भूमिकेसाठी कोणत्याही अभिनेत्यामध्ये आदर्श गुण असणे देखील अनिवार्य आहे, कारण शक्तीमान हा केवळ सुपरहिरोच नाही तर एक सुपर शिक्षक देखील बनला आहे. मोठमोठ्या अभिनेत्यांसाठीही त्यांची प्रतिमा पात्राच्या मधोमध येते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
रिहानाबाबत ओरीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘जामनगरमध्ये भेटण्यापूर्वी ती कोण आहे मला माहीत नव्हते’
‘सॅम बहादूर’ आणि ‘ॲनिमल’च्या बॉक्स ऑफिस क्लॅशवर विकीने मौन तोडले; म्हणाला, आमचा चित्रपट…’