Friday, November 22, 2024
Home टेलिव्हिजन राखीचा पती आदिल दुर्रानीवर बला’त्काराचा आरोप, तरुणीने तक्रार नोंदवत सांगितले सत्य

राखीचा पती आदिल दुर्रानीवर बला’त्काराचा आरोप, तरुणीने तक्रार नोंदवत सांगितले सत्य

टीव्ही अभिनेत्री आणि मॉडेल राखी सावंत गेल्या अनेक दिवसांपासून तिचा पती आदिल दुर्रानी  सोबतच्या वादामुळे चर्चेत आहे. तिने तिच्या पतीवर मारहाण आणि फसवणूक सराखे अनेक गंभीर आरोप लावले होते. या आरोपानंतर पोलिसांनी आदिलला 14 दिवसांसाठी कोठडी सुनावली आहे. मात्र, या प्रकरणामध्ये आदिलच्या अडचणीत अजूनच वाढ झाली आहे. एका इरानी विद्यार्थीनीने आदिलवर बला’त्कार आणि धमकी देण्याचा आरोप केला आहे.

‘ड्रामा क्वीन’ म्हणून प्रसिद्धी झोतात असेलेली अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) च्या आयुष्यामध्ये काही दिवसातच संकटांचा डोंगर कोसळला होता. आधी तिच्या आईचे निधन आणि नंतर पती आदिल दुर्रानी (Adil Durrani)चा दगा या सगळ्या गोष्टींना त्रासलेल्या राखीच्या पतीबद्दल अजून मोठी बातमी समोर आली आहे. आदिल विरोधात मैसूरमध्ये तक्रार दाखल केली आहे. एका इराणी विद्यार्थीनीने वीवी पुरम पोलिस ठाण्यात बला’त्कार आणि धमकी देण्याची तक्रार नोंदवली आहे.

माध्यमातील वृत्तानुसार इराणी विद्यार्थिनी डॉक्टर ऑफ फार्मसीचं शिक्षण घेण्यासाठी भारतात आली होती. विद्यार्थिनी आणि आदिल खानची पहिली भेट डेझर्ट लॅब फूड अड्डामध्ये झाली होती. त्यावेळी आदिल फूड आउटलेटचा मालक होता. नंतर हळूहळू दोघांमध्ये जवळीक वाढली.

 

View this post on Instagram

 

इराणी विद्यार्थीनीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, आदिलने  तिला लग्नाचं वचन देत मैसूरमधील एका अपार्टमेंटमध्ये तिच्यावर बला’त्कार केला. या अपार्टमेंटमध्ये ते दोघेच एकत्र राहत होते. पाच महिन्यापूर्वी जेव्हा विद्यार्थीनीने आदिलला लग्न करण्यास मागे लागली तेव्हा आदिलेन लग्न करण्यास नकार दिला आणि तिच्या सारख्या अनेक मुलींसोबत त्याचे सबंध असल्याचे सांगितले. मग या तरुनीने त्यला पोलिसांत नेण्याची भाषा केली तेव्हा आदिलने तिला दोन वेगवेगळ्या नंबरवरुन तिचे काही इंटिमेट फोटो पाठवले ज्यामुळे तरुनी काहीच करु शकली नाही.

तक्रार नोंदवताना विद्यार्थीनीने मोबाईल नंबरचाही उल्लेख केला. याशिवाय ती पोलिसांकडे गेली तर तिचे फोट सोशल मीडियावर व्हायरल करेल. त्यासोबतच तिच्या पालकांनाही फोटो पाठवले जातील. एवढंच नाही तर कोणत्याही प्रकारची तक्रार केल्यास आदिलने जिवे मारण्याचीही धमकी विद्यार्थीनीला दिली होती.

राखीच्या आरोपानंतर या प्रकरणाने नवीन वळन घेतलं आहे. राखीने देखिल तिच्या सोबत आदिल कसा वागला आणि तिला मारहान केली या सगळ्या गोष्टींचा खुलासा केला होता. आता मात्र, विद्यार्थीनीच्या तक्रारीनंतर आदिलवर कोणत्या प्रकारे कारवाई केली जाईल हे पाहाणे खूपच महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
विवेक अग्निहोत्रींनी पुन्हा एकदा बॉलिवूडकरांवर साधला निशाणा; म्हणाले, ‘मोदींमुळे मला…’
शिव ठाकरेच्या आई-वडिलांच्या साधेपणाची चाहत्यांनाही भुरळ; म्हणाले, ‘एवढे चांगले संस्कार…’

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा