Saturday, April 19, 2025
Home अन्य बिग बॉस ओटीटीनंतर राकेश बापटचे टीव्हीवर होणार धमाकेदार कमबॅक, ‘या’ दिग्गज निर्मात्यासोबत करणार काम

बिग बॉस ओटीटीनंतर राकेश बापटचे टीव्हीवर होणार धमाकेदार कमबॅक, ‘या’ दिग्गज निर्मात्यासोबत करणार काम

राकेश बापट टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील हँडसम आणि चार्मिंग अभिनेता. राकेशने अनेक हिट मालिकांसोबतच काही बॉलिवूड सिनेमांमध्ये देखील काम केले. मात्र मागील काही काळापासून राकेश टीव्हीवरून गायब आहे. मागच्यावर्षी राकेशने बिग बॉस ओटीटीमध्ये सहभाग घेतला आणि तो पुन्हा प्रकाशझोतात आला. या शोमधून त्याला त्याच्या तब्येतीच्या कारणास्तव मधेच शो सोडून जावे लागले असले, तरी या शोचा त्याला खूप फायदा झाला. त्याच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीत तुफान भर पडली आणि आता पुन्हा एकदा राकेश टीव्हीवर दिसणार आहे.

राकेश कोणत्याही रियॅलिटी शोमधून नाही तर एका मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. टीव्ही इंडस्ट्रीमधील सर्वात यशस्वी निर्माता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजन शाही यांच्या शोमधून टीव्हीवर पुनरागमन करणार आहे. राजन शाही यांच्या आगामी शोमधून राकेश शाहीर शेखसोबत टीव्हीवर परतेल.

राकेश शेवटचा तब्ब्ल सात वर्षांपूर्वी कबूल हैं या शोमध्ये दिसला होता. राकेशने त्याच्या या कमबॅकबद्दल म्हटले, “मला टीव्हीवर काम करून खूप मोठा काळ झाला. कबूल है माझा शेवटचा शो होता जो २०१४ साली आला. मला काम करताना मी ज्यांच्यासोबत काम करतोय त्यांच्याशी माझ्या वाइब्स जुळल्या पाहिजे. टीम योग्य असायला पाहिजे. याच कारणांसाठी मी मागील काही काळ टीव्हीपासून दूर होतो. मात्र आता असे नाहीये. राजन सरांसोबत माझी एनर्जी मॅच करते. म्ही सोबत काम करत असून, आम्ही ‘सात फेरे’ हा शो सोबत केला होता. मला त्यांच्या कामाची पद्धत आणि व्हिजन खूप आवडते. जेव्हा त्यांनी मला शो ऑफर केला तेव्हा मी लगेच हो म्हटले.”

या आगामी शोमध्ये राकेश शाहीरच्या मोठ्या भावाच्या भूमिकेत दिसणार असून, राकेश या शोसाठी खूपच उत्साही आहे. राकेशने त्याच्या अभिनयाच्या करिअरची सुरुवात ‘तुम बिन’ सिनेमापासून केली. त्यानंतर तो अनेक चित्रपटांमध्ये झळकला. तर राजन शाही यांनी ‘सपना बाबुल का.. बिदाई’, ‘अमृत मंथन’, ‘कुछ तो लोग कहेंगे’, ‘हवन’, ‘यह रिश्ता क्या कहलाता है’, ‘अनुपमा’ आदी शो दिले असून, सर्वच शो तुफान गाजले आहेत.

हेही वाचा :

हे देखील वाचा