Saturday, May 23, 2026
Home अन्य ‘बिग बॉस ओटीटी’ स्क्रिप्टेड? स्पर्धक राकेश बापटने शोबद्दल केले मोठे खुलासे

‘बिग बॉस ओटीटी’ स्क्रिप्टेड? स्पर्धक राकेश बापटने शोबद्दल केले मोठे खुलासे

नुकताच ‘बिग बॉस ओटीटी’ संपला आहे आणि आता प्रेक्षक ‘बिग बॉस १५’ ची वाट पाहत आहेत. ‘बिग बॉस’च्या या ओटीटी व्हर्जनला देखील प्रेक्षकांची भरभरून पसंती मिळाली. या शोमध्येही टीव्हीवरील अनेक प्रसिद्ध कलाकार सामील झाले होते. ज्यांनी शोमध्ये मजामस्ती, सोबतच जोरदार भांडणही केली. चालू असताना हा शो सतत चर्चेत असायचा. मात्र संपल्यानंतर एका विशिष्ट कारणामुळे हा शो पुन्हा चर्चेत आला आहे.

‘बिग बॉस ओटीटी’मध्ये टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेता राकेश बापटसह अनेक लोकप्रिय कलाकार सहभागी झाले होते. शोमध्ये राकेशला खूप पसंत केले गेले. तो फिनालेपर्यंत पोहचला, मात्र दिव्या अग्रवालने ‘बिग बॉस’ची ट्रॉफी जिंकली.

अलीकडेच राकेश एका मुलाखतीत या शोबद्दल बोलला आहे. त्याला शोबद्दल काही गोष्टी समजल्या नाही. राकेशने सांगितले की, त्याला घरातल्या लोकांचे समीकरण समजत नव्हते. घरात लोक खूप भांडायचे आणि लगेचच एका मिनिटानंतर त्याच व्यक्तीला मिठी मारताना दिसायचे.

राकेशने असेही सांगितले की, त्याला हे सर्व खरे वाटले नाही. तो स्टँड घेऊ शकत नाही, असे म्हणून राकेशला अनेकवेळा टार्गेट केले गेले होते. राकेशने दिलेल्या मुलाखतीत याबद्दल बोलताना सांगितले की, “मी नेहमीच परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. मी अशा लोकांपैकी आहे ज्यांना इतरांची काळजी आहे. मला इतरांना दुखवायला आवडत नाही. एखाद्याला नाही म्हणणे माझ्यासाठी सोपे नाही. मी ती परिस्थिती इतर कोणत्याही प्रकारे हाताळेल. तिथल्या सगळ्यांना सांभाळणं माझ्यासाठी अवघड होतं. मी तिथे विचार करायचो की, ज्या समस्या घरामध्ये मोठ्या म्हणून सांगितल्या जात होत्या, त्या मुळातच समस्या नाहीत. असे वाटायचे की, हे सर्व फॉरमॅट आहे.”

‘भांडण करून लगेच बनायचे मित्र’
राकेश पुढे म्हणाला, “आपल्याला वास्तविक जीवनात अनेक मोठ्या परिस्थितीचा सामना करावा लागतो. मला कळाले आहे की, तिथला पॅटर्न लढा आणि फक्त लढा आहे. मग दिवसभर भांडणारे तेच लोक संध्याकाळी एकमेकांना मिठी मारताना दिसत होते, जणू ते मित्र आहेत. ते असे का करतात, हे मला समजू शकले नाही. जेव्हा तुम्ही कोणाशी भांडता, तेव्हा तुम्ही त्याचे शत्रू बनता.”

‘गोष्टी रियल नव्हत्या’
अभिनेता म्हणाला, “माझ्यासाठी हे सर्व कुठेतरी स्क्रिप्टेड होतं. मला ते सर्व खरं वाटत नव्हतं. तुम्हाला ट्रॉफी जिंकायची आहे, म्हणून तुम्ही भांडत आहात? होय हा एक खेळ आहे, तुम्ही भांडता ते समजण्यासारखे आहे, पण काही गोष्टी विचित्र होत्या.”

लवकरच या शोचा १५ वा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमान खानचा हा शो २ ऑक्टोबरला सुरू होणार आहे. शोबाबत सतत वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. यामुळे चाहते आता शोच्या प्रीमियरची आतुरतेने वाट पाहत आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-Bigger Boss 15: शोमध्ये सहभागी होणाऱ्या ‘या’ पाच स्पर्धकांच्या नावावर शिक्कामोर्तब

-अनोख्या फॅशन सेन्समुळे पुन्हा चर्चेत आली उर्फी जावेद, व्हायरल फोटोवर ट्रोलर्सचा निशाणा

-जेव्हा अक्षय कुमारवर झाला होता जीवघेणा हल्ला; आवाज जरी केला, तर झाडल्या गेल्या असत्या गोळ्या

हे देखील वाचा