Friday, August 1, 2025
Home बॉलीवूड भारीच ना! ‘नॅशनल क्रश’ वरुण धवनसोबत करणार बॉलिवूड पदार्पण? दोघांचा डान्स व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

भारीच ना! ‘नॅशनल क्रश’ वरुण धवनसोबत करणार बॉलिवूड पदार्पण? दोघांचा डान्स व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल 

दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. सोशल मीडियावरून ती आपले नवनवीन व्हिडिओे आणि फोटो शेअर करत असते. तिचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. रश्मिकाच्या सौंदर्यावर फिदा असलेले असंख्य चाहते नेहमीच पाहायला मिळतात. म्हणूनच तिला ‘नॅशनल क्रश’ अशी नवीन ओळख मिळाली आहे. सध्या रश्मिकाचा वरुण धवनसोबतचा एक डान्स  व्हिडिओ सगळीकडे तुफान व्हायरल होत आहे. त्यांच्या या व्हिडिओने आता दोघांचा नवीन चित्रपट येणार असल्याच्या बातम्या रंगल्या आहेत. कोणता आहे तो व्हिडिओ चला जाणून घेऊया… 

दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका (Rashmika Mandana) आणि सुपस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटाने प्रचंड लोकप्रियता मिळवली. चित्रपटातील अभिनेत्री रश्मिकाच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले होते. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली होती. आता रश्मिका आणि बॉलिवूड अभिनेता वरुण धवनचा (Varun Dhawan) डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. अभिनेता वरुणने हा व्हिडिओ आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले आहेत. आता या व्हिडिओने तिच्या बॉलिवूडमधील पदार्पणाची चर्चा जोर धरू लागली आहे.

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, सध्या सोशल मीडियावर Arabic Kuthu HABIBO हे गाणे जोरदार ट्रेंडिंग होत आहे. या गाण्यावर आतापर्यंत लाखो रील्स तयार झाले आहेत. अभिनेत्री रश्मिका आणि वरुणचा डान्ससुद्धा याच गाण्यावर आहे. हे गाणे अभिनेता थालापती विजयच्या ‘बिस्ट’ या चित्रपटातील आहे. व्हिडिओत रश्मिका आणि वरुणचा तडफदार डान्स पाहायला मिळत आहे. यामध्ये रश्मिकाने रंगीत शॉर्ट स्कर्ट घातलेली दिसत आहे, तर अभिनेता वरुणने काळा गॉगल  आणि टी- शर्टमध्ये धमाल केली आहे.

त्यांच्या चाहत्यांना हा व्हिडिओ चांगलाच आवडला असून अवघ्या काही तासात हा व्हिडिओ १ कोटी ३ लाखांपेक्षा जास्त जणांनी पाहिला आहे. तसेच या व्हिडिओला २७ लाखांहून अधिक लाईक्सही मिळाले आहेत. आता रश्मिका खरंच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार का हाच प्रश्न या व्हिडिओमुळे सर्वांना पडला आहे. या व्हायरल व्हिडिओआधी रश्मिकाने वरुण सोबतचा एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा