‘तु किती वेळा सिगारेट घेतेस?’ युजरच्या या प्रश्नावर ‘नॅशनल क्रश’ रश्मिकाने ‘अशी’ दिली प्रतिक्रिया


आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना एका नजरेत घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे रश्मिका मंदाना होय. तिला सर्वत्र ‘नॅशनल क्रश’ म्हणून ओळखतात. दाक्षिणात्य सृष्टीत नावारूपाला आलेली ही अभिनेत्री आज संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे. तिच्या चाहत्यांना इंप्रेस करण्याची एकही संधी ती सोडत नाही. म्हणूनच तिच्या चाहत्यांची यादी दिवसेंदिवस वाढतच आहे.

रश्मिका सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिच्या आयुष्यातील अपडेट ती नेहमीच तिच्या चाहत्यांना देत असते. नुकतेच तिने इंस्टाग्रामवर लाईव्ह सेशन घेतले होते. ज्यात तिच्या चाहत्यांनी तिला अनेक प्रश्न विचारले होते. ज्याची तिने उत्तर दिली होती. या सेशनमध्ये चाहत्यांनी तिला वेगवेगळे अनेक प्रश्न विचारले होते. त्यावेळी त्यांनी स्मोकिंगबाबत, अल्लू अर्जुन आणि विजयसोबत काम करण्याच्या अनुभव याबाबत अनेक प्रश्न विचारले. तिने देखील या सगळ्या प्रश्नाची उत्तरं दिली होती.(Rashmika mandanna talk about smoking cigarettes)

या लाईव्ह सेशनमध्ये तिच्या एका चाहत्याने तिला विचारले की, “तु किती वेळा सिगारेट घेतेस.” त्यावेळी अभिनेत्रीने उत्तर दिले की, ती सिगारेट घेत नाही. एवढंच काय, तर सिगारेट घेत असणाऱ्या लोकांच्या शेजारी पण उभी राहत नाही. या नंतर एका चाहत्याने तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. यावर रश्मिका म्हणाली की, “निदान चांगल्या पद्धतीने तरी प्रपोज कर.”

रश्मिकाने अभिनेता अल्लू अर्जुनसोबत काम करण्याचा अनुभव देखील या दरम्यान शेअर केला. ती म्हणाली की, “पुष्पा या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत काम करताना मला खूप चांगला अनुभव आला. अल्लू अर्जुन हा एक मजेशीर आणि प्रेमळ अभिनेता आहे. तो एक उत्कृष्ट अभिनेता आणि कमालीचा डान्सर आहे. त्याच्यासोबत काम करताना मला खूप मजा आली.”

रश्मिकाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती सध्या सिद्धार्थ मल्होत्रासोबत मुंबईमध्ये ‘मिशन मजनू’ या चित्रपटाची शूटिंग करत आहे. यासोबत ती लवकरच अल्लू अर्जुनसोबत ‘पुष्पा’ या चित्रपटात दिसणार आहे. ती अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘गुड बाय’ या चित्रपटात देखील काम करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘केजीएफ’ स्टार यशने खरेदी केले कोटींचे आलिशान घर; पत्नी राधिकासोबत पूजा करताना दिसला अभिनेता

जेव्हा वडिलांसोबत चित्रपट बघताना अचानक इंटीमेट सीन यायचा, तेव्हा…; तापसीने सांगितला ‘तो’ किस्सा

-महिमा चौधरी ट्रोलर्सच्या निशाण्यावर; मंदिरा बेदीच्या पतीच्या मृत्यूवर ‘अशाप्रकारे’ दुःख व्यक्त केल्याने नेटकरी झाले नाराज


Leave A Reply

Your email address will not be published.