Friday, July 5, 2024

लग्नानंतरच्या पहिल्या सणाचे फोटो शेअर करत, दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा; रसिकाच्या पारंपारिक लूकने वेधले चाहत्यांचे लक्ष

नुकतेच काही दिवसांपूर्वी एक मराठमोळी अभिनेत्री लग्न बंधनात अडकली. कोणालाही लग्नाच्या तारखेची पूर्व कल्पना न देता लग्न केल्याने तिच्या चाहत्यांमध्ये काही प्रमाणात नाराजीचे वातावरण पसरले होते. परंतु सगळ्यांनाच तिचे लग्न झाल्याचा खूप आनंद झाला. ती अभिनेत्री म्हणजे आपल्या सगळ्याची लाडकी शनाया म्हणजेच रसिका सुनील होय. लग्न होताच या जोडीचा पहिलाच सण दिवाळी आला आहे. त्यांच्या पहिल्याच दिवाळीची झलक त्यांनी सोशल मीडियावर दाखवली आहे.

रसिकाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून लक्ष्मीपूजनाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, रसिकाने साडी नेसलेली आहे. तसेच नाकात नथ, हातात बांगड्या, कपाळी टिकली आणि गळ्यात मंगळसूत्र असा सगळा नवीन नवरीप्रमाणे साजशृंगार केला आहे. पहिल्या फोटोमध्ये ती लक्ष्मीपूजन करताना दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोत तिच्यासोबत तिचा पती आदित्य बिलागी दिसत आहे. नेहमीच वेस्टर्न आणि मॉर्डन ड्रेसमध्ये दिसणाऱ्या रसिकाला असे पारंपारिक पोशाखात पाहून तिचे चाहते खूप खुश झाले आहेत. (Rasika sunil share her diwali look photo on social media and give best wishes of diwali)

तिचे अनेक चाहते या फोटोवर कमेंट करत त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत. तसेच अनेकजण त्यांना त्यांच्या वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत. रसिका आणि आदित्यने सोमवारी (१८ ऑक्टोबर) रोजी गोव्यामध्ये अगदी मोजक्या माणसांच्या उपस्थित लग्न केले आहे. लग्नाच्या १५ दिवसानंतर त्यांनी फोटो शेअर करून सगळ्यांना त्यांच्या लग्नाची माहिती दिली.

रसिकांच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तिने झी मराठी वरील लोकप्रिय मालिका माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत काम केले आहे. तसेच तिने ‘पोश्टर गर्ल्स’ मधून चित्रपटात पदार्पण केले होते. तिने ‘बघतोस काय मुजरा कर’, ‘बस स्टॉप’, ‘गॅट मॅट’ आणि ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटातही काम केले आहे. याशिवाय रसिका ‘तुम बिन मोहे’ या अल्बम गाण्यातही झळकली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘या’ मराठी अभिनेत्रींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्या चाहत्यांना दीपावलीच्या शुभेच्छा

-पारंपारिक वेशभूषेत ‘या’ मराठमोळ्या लावण्यवतींनी दिल्या दिपावलीच्या शुभेच्छा! पाहा फोटो

-रितेश भैय्याचा अंदाजच लई भारी! बच्चे कंपनीसोबतचा व्हिडिओ शेअर करत दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

हे देखील वाचा