‘शनाया’ या चंचल, नटखट आणि बिनधास्त पात्राने आख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे रसिका सुनील. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील तिच्या पात्राला खूप पसंती मिळाली होती. खलनायकाच्या भूमिकेत असूनही तिने सर्वांना तिच्या प्रेमात पाडले होते. प्रेक्षक तिचा द्वेष करत असले, तरी प्रेक्षकांना ती तेवढीच हवीहवीशी वाटत होती. या मालिकेत तिने काही काळासाठी ब्रेक घेतला होता, तरी देखील प्रेक्षकांनी तिला नव्याने स्वीकारली होती. शनाया जेवढी मस्तीखोर होती तेवढीच रसिका देखील मस्तीखोर आहे. याची प्रचिती आपल्याला तिच्या सोशल मीडिया पोस्टवरून येतच असते. अशातच तिने सोशल मीडियावर तिचा एक फोटो शेअर केला आहे.
रसिका नुकतेच एक महिन्यापूर्वी लग्नबंधनात अडकली आहे. तिने कोणालाही न सांगता तिचा बॉयफ्रेंड आदित्य बिलागीसोबत लग्न केले आहे. अशातच तिच्या हनीमूनसाठी रसिका मालदीवला पोहोचली आहे. तिने सोशल मीडियावर तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, रसिका समुद्रकिनारी बसलेली दिसत आहे. तिचा हा फोटो मागून काढला आहे. तिने पांढऱ्या आणि केशरी रंगाची मोनोकनी घातली आहे. (Rasika sunil share her maldives photo on social media)
हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “मालदीवमधील फोटोसोबत सुरू करूयात.” तसेच तिने हे देखील सांगितले आहे की, हा फोटो आदित्यने काढला आहे. त्यामुळे ते दोघे हनिमूनला मालदीवला गेले आहेत, असा अंदाज सर्वजण लावत आहेत. तसेच तिच्या आणखी फोटोंची सर्वजण वाट पाहत आहेत.
रसिकाच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर तिने ‘पोश्टर गर्ल्स’ मधून चित्रपटात पदार्पण केले होते. तिने ‘बघतोस काय मुजरा कर’, ‘बस स्टॉप’, ‘गॅट मॅट’ आणि ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटातही काम केले आहे. याशिवाय रसिका ‘तुम बिन मोहे’ या अल्बम गाण्यातही झळकली आहे. यासोबतच ती एक पायलट देखील आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-उर्मिला कोठारेने केला एरियल डान्स, व्हिडिओ पाहून हटणार नाहीत तुमच्याही नजरा!