Friday, April 4, 2025
Home मराठी रसिका सुनीलने केले मालदीवमधील थ्रोबॅक फोटो शेअर, चाहते करतायेत कौतुकाचा वर्षाव

रसिका सुनीलने केले मालदीवमधील थ्रोबॅक फोटो शेअर, चाहते करतायेत कौतुकाचा वर्षाव

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री रसिका सुनील (Rasika sunil) सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. तिचे लग्न झाल्यापासून सोशल मीडियावरील तिचा वावर वाढला आहे. तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. तिने ‘माझ्या नवऱ्याची बायको‘ या मालिकेत काम करून सर्वत्र तिची ओळख निर्माण केली आहे. या मालिकेत तिने शनाया हे पात्र निभावले होते. मालिकेत ती नकारात्मक भूमिकेत होती. तरी देखील प्रेक्षकांनी तिला खूप प्रेम दिले. मध्यंतरी तिने या मालिकेतून ब्रेक घेतला होता, तरी देखील प्रेक्षकांनी तिला नव्याने स्वीकारली होती. अशातच तिचे काही फोटो समोर आले आहेत.

रसिकाने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने गुलाबी रंगाचा सुंदर असा ड्रेस घातला आहे. तिने गुलाबी रंगाचा स्लिव्हलेस गाऊन घातला आहे. तसेच पायात पांढऱ्या रंगाचे शूज घातले आहे. या फोटोमध्ये ती वेगवगेळ्या पोझ देताना दिसत आहे. एका फोटोमध्ये तिने बसून पोझ दिली आहे. तिचे हे फोटो तिचा पती आदित्य बिलागी याने काढले आहेत. (Rasika Sunil share her photos on social media)

तिने शेअर केलेले हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. अनेकजण या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. ती जेव्हा मालदीवला गेली होती तेथील हे फोटो आहे.

रसिकाने १८ ऑक्टोबर रोजी तिचा बॉयफ्रेंड आदित्य बिलागीसोबत गोव्यात लग्न केले आहे. त्यांनी कोणालाही कल्पना न देता लग्न केले होते. १५ दिवसांनी त्यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करून त्यांच्या चाहत्यांना लग्नाची बातमी सांगितली. तिच्या या बातमीने तिच्या चाहत्यांना खूप आनंद झाला होता.

रसिकाच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर तिने ‘पोश्टर गर्ल्स’ मधून चित्रपटात पदार्पण केले होते. तिने ‘बघतोस काय मुजरा कर’, ‘बस स्टॉप’, ‘गॅट मॅट’ आणि ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटातही काम केले आहे. याशिवाय रसिका ‘तुम बिन मोहे’ या अल्बम गाण्यातही झळकली आहे.

हेही वाचा : 

अरेरे! कॉल टाइमवरून पुरता वैतागला श्रेयश तळपदे, सेटवरील व्हिडिओ आला समोर

‘चल रे घोड्या टुगुडुक टुगुडुक!!’ माधवी निमकरने घोडयावर बसून केला फोटो शेअर, चाहते म्हणाले…

‘बिग बॉस मराठी’च्या चावडीवर जय अन् उत्कर्षने केली ‘ही’ अतरंगी डिमांड पूर्ण, एक नजर टाकाच

 

हे देखील वाचा