‘चल रे घोड्या टुगुडुक टुगुडुक!!’ माधवी निमकरने घोडयावर बसून केला फोटो शेअर, चाहते म्हणाले…


आपल्या आयुष्यात फिटनेसला खूप महत्व आहे. त्यात कलाकार म्हटले तर ते २४ तास त्यांच्या फिटनेसची काळजी घेत असतात. अशीच मराठी टेलिव्हिजनवरील एक नावाजलेली खलनायिका देखील तिच्या फिटनेसची खूप चांगल्याप्रकारे काळजी घेताना दिसत असते. ती अभिनेत्री म्हणजे माधवी निमकर (Madhavi Nimkar) होय. माधवी अनेकवेळा तिचे जिम करताना आणि योगा करताना व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच तिचा एक किलर फोटो समोर आला आहे.

माधवीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, माधवी एका घोड्यावर बसलेली दिसत आहे. तिने नऊवारी साडी नेसली आहे. तसेच गळ्यात मंगळसूत्र आणि बाकी सगळा साजशृंगार केला आहे. या फोटोमध्ये तिचा लूक खूपच भारदस्त दिसत आहे. तिचा हा लूक सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अनेकांना हा फोटो खूप आवडला आहे. (actress madhavi nimkar share her photo on social media)

हा फोटो शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “कॅप्शन प्लिज.” तिच्या या फोटोवर अनेकजण कमेंट करून तिला कॅप्शन देत आहे. एकाने या फोटोवर कमेंट केली आहे की, “लो चली मैं अपने देवर की बारात लेके.” तसेच आणखी एकाने कमेंट केली आहे की, “चल रे घोड्या टुगुडुक टुगुडुक.” अशाप्रकारे तिच्या या फोटोवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

माधवीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने २००९ साली ‘बायकोच्या नकळतचं’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. यानंतर तिने ‘असा मी तसा मी’ या चित्रपटात काम केले. तिने ‘धावाधाव’, ‘सगळं करून भागले’, ‘संघर्ष’ या चित्रपटात काम केले आहे. यानंतर तिने तिच्या अभिनयाचा मोर्चा मराठी टेलिव्हिजनकडे वळवला. तिने ‘स्वप्नांच्या पलीकडले’, ‘हम तो तेरे आशिक है’, ‘द रायरीकर केस’ या मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या ती स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत नकारात्मक भूमिकेत काम करत आहे. तरी देखील मालिकेतील तिचे पात्र आणि डायलॉग तिच्या चाहत्यांना खास भुरळ घालत आहेत.

हेही वाचा :


Latest Post

error: Content is protected !!