अरेरे! कॉल टाइमवरून पुरता वैतागला श्रेयश तळपदे, सेटवरील व्हिडिओ आला समोर


झी मराठी या वाहिनीवर या वर्षी अनेक नवीन मालिका आल्या आहेत. यातील ‘माझी तुझी रेशीमगाठ‘ (Majhi Tujhi Reshimgath) या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मालिकेत प्रार्थना बेहेरे (Prarthana Behere) आणि श्रेयश तळपदे (Shreyas talpade) हे कलाकार काम करत आहेत. रूपेरी पदड्यावर काम केल्यानंतर हे कलाकार टेलिव्हिजनवर अवतरले आहेत. दोघांनीही मराठी चित्रपटात काम केले आहे. श्रेयश तळपदेने हिंदी चित्रपटात काम करून देखील नाव कमावले आहे. त्यामुळे त्यांची फॅन फॉलोविंग जबरदस्त आहेत. मालिकेत त्यांच्यासोबत बालकलाकार मायरा वैकुळ (Myra Vaikul) ही आहे, तिला देखील प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत होता.

श्रेयसला छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा पाहून त्याचा चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. सोशल मीडियावर तो अनेक गोष्टी शेअर करत असतो. अशातच त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. जो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, तो त्याच्या मालिकेच्या सेटवर व्हॅनिटी व्हॅनमध्ये बसून त्याचा सीनची वाट पाहत असतो. तो तिथे मेकअप करून वैतागलेला दिसत आहे. तो येतो आणि “रेड्डी?”, असे विचारतो. तेव्हा त्याला “नाही” असे उत्तर मिळते. यानंतर तो पुन्हा आत जातो आणि मोबाईल आणि लॅपटॉपवर टाईमपास करतो आणि बाहेर येऊन “मला बोलावले का?”, असे विचारतो. तरी देखील त्याला नाही असे सांगितले. नंतर तो एक झोप काढतो आणि पुन्हा येऊन विचारतो की, “जाऊ का? ” (actor shreyas talpade tired about call timing, video viral on social media)

त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ शेअर करून त्याने कॅप्शन दिले आहे की, “इन्तहा हो गई, इंतज़ार की आयी ना कुछ ख़बर, मेरे कॉल टाइम की.” या व्हिडिओवर अनेक कलाकारांनी या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. अभिनेता कुणाल खेमूने हसण्याची इमोजी पोस्ट केली आहे. तसेच बाकी अनेक चाहते या व्हिडिओवर कमेंट करत आहेत.

हेही वाचा :


Latest Post

error: Content is protected !!