×

महाराष्ट्र दिनी रसिका सुनीलचा मराठमोळा बाज, सोशल मीडियावर फोटोंनी घातला धुमाकूळ

‘शनाया’ या चंचल, नटखट आणि बिनधास्त पात्राने आख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे रसिका सुनील. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील तिच्या पात्राला खूप पसंती मिळाली होती. खलनायकाच्या भूमिकेत असूनही तिने सर्वांना तिच्या प्रेमात पाडले होते. प्रेक्षक तिचा द्वेष करत असले, तरी प्रेक्षकांना ती तेवढीच हवीहवीशी वाटत होती. या मालिकेत तिने काही काळासाठी ब्रेक घेतला होता, तरी देखील प्रेक्षकांनी तिला नव्याने स्वीकारली होती. शनाया जेवढी मस्तीखोर होती तेवढीच रसिका देखील मस्तीखोर आहे. याची प्रचिती आपल्याला तिच्या सोशल मीडिया पोस्टवरून येतच असते.

View this post on Instagram

A post shared by K2fashioncloset (@k2fashioncloset)

परंतु यावेळी तिने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून एक आगळे वेगळे फोटोशूट केले आहे. ज्यात तिने नऊवारी साडी नेसली आहे. यात तिचा मराठमोळा बाज पाहायला मिळत आहे. तिने जांभळ्या रंगाची साडी नेसली आहे. तसेच चोळी घातली आहे. यावर तिने नाकात नथ आणि फेटा बांधला आहे. यात ती अगदी राजेशाही थाटात दिसत आहे. काही फोटोंमध्ये ती घोड्यावर बसलेली दिसत आहे. घोड्यावर बसून ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

हे फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, राकट देशा, कणखर देशा,
दगडांच्या देशा, नाजुक देशा,
कोमल देशा, फुलांच्याही देशा
प्रणाम घ्यावा माझा हा
श्री महाराष्ट्र देशा….
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा.”

तिने शेअर केलेल्या या फोटोंवर अनेकजण कमेंट करत आहेत. तिच्या चाहत्यांना तिचा हा मराठमोळा लूक खूप आवडला आहे. त्यामुळे सगळेजण तिच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by K2fashioncloset (@k2fashioncloset)

रसिकाच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर तिने ‘पोश्टर गर्ल्स’ मधून चित्रपटात पदार्पण केले होते. तिने ‘बघतोस काय मुजरा कर’, ‘बस स्टॉप’, ‘गॅट मॅट’ आणि ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटातही काम केले आहे. याशिवाय रसिका ‘तुम बिन मोहे’ या अल्बम गाण्यातही झळकली आहे. यासोबतच ती एक पायलट देखील आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post