×

प्रसिद्ध रिल्स स्टार किली पॉलवर अज्ञातांकडून चाकूने हल्ला, सोशल मीडियावर केला घटनेचा उलगडा

आजकाल सोशल मीडियावर अनेक रिल्स स्टार आपल्याला पाहायला मिळतात. त्यांची लोकप्रियता देखील आता गगनाला भिडली आहे. यातीलच एक प्रसिद्ध रील स्टार म्हणजे किली पॉल. त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. अशातच त्याच्याबाबत एक बातमी समोर आली आहे. किली पॉलवर चाकूने हल्ला झाला आहे. काही अज्ञात लोकांनी त्याच्यावे हल्ला केला आहे. या गोष्टीची माहिती त्याने स्वतः सोशल मीडियावर दिली आहे.

किलीने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. त्याने स्टोरी पोस्ट केली आहे. त्यात त्याने लिहिले आहे की, “५ अज्ञात लोकांनी माझ्यावर हल्ला केला आहे. माझ्या उजव्या हाताच्या बोटाला गंभीर जखम झाली आहे. माझ्या बोटाला ५ टाके पडले आहेत. तसेच माझ्यावर काठयांनीं हल्ला देखील करण्यात आला आहे. मी देवाचे आभार मानतो की, मी बचावलो आहे.” गंभीर जखम होऊनही किली बचावला आहे.

View this post on Instagram

A post shared by Kili Paul (@kili_paul)

त्याने दिलेले या बातमीने त्याच्या चाहत्यांना खूप वाईट वाटले. परंतु आता तो ठीक असल्याने चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. किली पॉल आणि त्याची बहीण निमी पॉल हे दोघेही टांझानियाचे आहेत. ते सोशल मीडियावर बॉलिवूड गाण्यांवर रिल्स बनवत असतात. त्यांच्या व्हिडिओला देखील सोशल मीडियावर भरभरून प्रतिसाद मिळत असतो. त्यांचे सोशल मीडियावर ३६ लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत.

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात त्या दोघांचे कौतुक केले. भारतात त्यांना उत्तम प्रतिसाद मिळतो म्हणून त्यांचे कौतुक केले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘मी परफेक्ट नाहीये’, लूकबद्दल प्रश्न उपस्थित केल्यानंतर अनुष्काने दिले होते प्रत्युत्तर

अनुष्काबरोबरच्या पहिल्याच भेटीत विराटने जोक मारला अन् तो फसला, पुढे अनुष्काने…

Prema Kiran | लक्ष्याची ‘अंबाक्का’ काळाच्या पडद्याआड, प्रसिद्ध अभिनेत्री प्रेमा किरण यांचे निधन

Latest Post