Monday, July 1, 2024

हे काय भलतंच… विराटचं शतक 5 धावांनी हुकल्यावर अनुष्काने शेअर केला ‘तो’ व्हिडिओ; कॅप्शन चर्चेत

भारताने विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडला तब्बल 20वर्षांनी हरवले. या विजयासह टीम इंडियाने विश्वचषक स्पर्धेच्या पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी झेप घेतली आहे. धर्मशालामध्ये झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 49.4 षटकांत 273 धावा केल्या. न्यूझीलंडकडून डेव्हॉन कॉनवेने 62 धावा केल्या, तर कप्तान केन विलियमसनने 37 धावा केल्या. भारताकडून मोहम्मद शमीने 4 विकेट घेतल्या.

भारतीय संघाने प्रत्युत्तरात 50.2 षटकांत 274धावा केल्या. भारताकडून रवींद्र जाडेजाने नाबाद 39 धावा केल्या, तर विराट कोहलीने 95 धावा केल्या. कोहलीने 89 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकार मारले. भारताला विजयासाठी 5 धावांची गरज होती आणि कोहलीला शतक पूर्ण करण्यासाठीही 5 धावांची गरज होती. यावेळी विराटने एक शॉट हवेत खेळला आणि तो 94 धावांवर बाद झाला. विराट कोहलीचं शतक थोडक्यात हुकलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

 या सामन्यात अनुष्का शर्मा (Anushka Sharma)मैदानावर उपस्थित नव्हती. परंतु, आपल्या पतीच्या कामगिरीचं कौतुक करण्यासाठी आणि त्याचं मनोबल वाढवण्यासाठी अनुष्काने आयसीसीच्या सोशल मीडिया पेजवरील एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ विराट 95 धावांवर झेलबाद होतानाचा आहे. तो व्हिडीओ शेअर करुन अनुष्काने कॅप्शनमध्ये “मला तुझा कायम अभिमान वाटतो”, असं लिहिलं आहे. तसेच दुसऱ्या एका पोस्टमध्ये अनुष्काने विराटला वादळाचा पाठलाग करणारा (स्टॉर्म चेसर) असं म्हटलं आहे.

विराट कोहलीच्या शतकाच्या हुकल्याबद्दल त्याचे चाहते काहीसे नाराज झाल्याचं पाहायला मिळालं. यानंतर नवऱ्याला खंबीरपणे साथ देण्यासाठी अनुष्काने एक व्हिडीओ शेअर करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. कोहलीच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याला पाठिंबा दिला आणि त्याला भविष्यात शतके करण्यास प्रोत्साहित केलं. (Rat Kohli century missed but India strong win over New Zealand actress Anushka Sharma shared the video)

आधिक वाचा-
लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या ‘सिद्धू’ने 5 वर्षे बघितली होती खऱ्या प्रेमाची वाट, वाचा त्याचा जीवनप्रवास
मराठी अभिनेत्रींना बिकिनीवरुन ट्रोल करणाऱ्यांना तेजस्विनीने दिले चोख उत्तर; म्हणाली, ‘बिकिनी नाही घालणार…’

हे देखील वाचा