Monday, July 15, 2024

‘मुस्लिम देशात लाऊडस्पीकरवर अजानला बंदी मग आपल्याकडे का नाही?’, प्रसिद्ध भक्तीगीत गायिकेचा रोखठोक सवाल

अनुराधा पौडवाल (Anuradha Paudwal) त्यांच्या सुंदर आवाज आणि गायनासाठी ओळखल्या जातात. त्यांनी गायलेली भजनं आजही लोक ऐकतात. चित्रपटातील गाण्यांमधील त्यांच्या स्वराबद्दल तर काय बोलावं! नुकतेच, अनुराधा पौडवाल यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना अजानच्या मुद्द्यावर आपले मत मांडले. यावेळी गायिकेने आजच्या तरुण पिढीला एक संदेशही दिला आहे.

‘आपल्या देशात लाऊडस्पीकरवर अजान का?’
अनुराधा पौडवाल यांनी मुलाखतीत सांगितले की, त्या जगातील अनेक ठिकाणी फिरल्या आहेत. पण इथे जसे घडते, तसे इतरत्र कुठेही होत नाही. त्या म्हणाल्या, “मी कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. पण इथे विनाकारण वाढवून प्रचार केला जातो. लाऊडस्पीकरवर मोठ्या आवाजात अजान वाजवली जाते. त्यामुळे इतरांना वाटते की, आपणही आपला लाऊडस्पीकर का वाजवू नये?” अनुराधा पुढे म्हणाल्या की, त्या मध्यपूर्वेतील देशांमध्येही गेल्या आहेत, जिथे लाऊडस्पीकरवर बंदी आहे. मुस्लिम देशांमध्ये लाऊडस्पीकरवर अजान वाजवली जात नाही, मग आपल्या देशात का? असा रोखठोक सवालही त्यांनी केला. (anuradha paudwal commented on loudspeaker azaan issue singer anuradha paudwal)

अजानमुळे लोक वाजवतात हनुमान चालीसा
अनुराधा पौडवाल पुढे म्हणाल्या की, “जर येथे लाऊडस्पीकरवर अजान वाजवली जाते, तर इथले लोक म्हणाले की, आम्ही हनुमान चालीसा वाजवू. त्यामुळे वाद वाढतात, जे अत्यंत खेदजनक आहे. म्हणूनच मी आदि शंकराचार्यांबद्दल बोलतेय, त्यांच्या सौंदर्य लाहिरीच्या लिपीत ताकद आहे, ती तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवते आणि विचार करण्याची क्षमता देते.”

‘आपल्या संस्कृतीची माहिती असायला हवी’
नवरात्री आणि रामनवमीच्या निमित्ताने अनुराधा पौडवाल यांनी तरुणांनाही संदेश दिला. त्या म्हणाल्या की, “मी एवढेच म्हणेन की, सर्वांनी एकत्र राहावे लागेल. संपूर्ण जगात सर्व संस्कृती मजबूत आहेत, त्या एकत्र आहेत. पण आपण प्रमाणाने जास्त आहोत, पण एकत्र कमी आहोत. आपण आपल्या मुलांना प्रेरणा दिली पाहिजे. आदि शंकराचार्य हे आपले धर्मगुरू आहेत आणि आपल्याला हे माहित असले पाहिजे. प्रत्येक ख्रिश्चनाला पोपबद्दल माहिती असेल आणि आपल्या संस्कृतीबद्दलही.” आपल्याकडे 4 वेद, 18 पुराणे आणि 4 मठ आहेत, हे तुम्हाला माहिती हवे, असेही यावेळी गायिका म्हणाल्या.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-
कमाईत ‘केजीएफ’ला मागे टाकणाऱ्या ‘कांतारा’चे कौतुक केल्याशिवाय नाही राहू शकले रजनीकांत; व्हायरल झालं ट्वीट
सेटवर ‘हे’ टेलिव्हिजन कलाकार झाले वादाचे शिकार, शेवटी ‘या’ मालिकेपासून व्हावं लागलं दूरा

हे देखील वाचा