Tuesday, June 24, 2025
Home बॉलीवूड घरच्यांचा विरोध झुगारून चित्रपटात आली अन रातोरात स्टार झाली ‘ही’ अभिनेत्री, वाचा तिचा जीवनप्रवास

घरच्यांचा विरोध झुगारून चित्रपटात आली अन रातोरात स्टार झाली ‘ही’ अभिनेत्री, वाचा तिचा जीवनप्रवास

हिंदी चित्रपटसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या अपघाताने किंवा चुकून चित्रपट क्षेत्रात आल्या मात्र नशिबाने साथ दिल्याने रातोरात स्टार झाल्या. यामध्ये नाव घेतले जाते ते म्हणजे अभिनेत्री रती अग्निहोत्रीचे काय होता तिचा प्रवास चला जाणून घेऊ. 

रती (rati)अग्निहोत्री ही 80 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या अभिनयाने तिने ‘एक दुजे के लिए’, ‘शौकीन’, ‘उलटा सीधा’, ‘पसंद अपनी अपनी’ असे अनेक चित्रपट यशस्वी केले आहेत. आपल्या कसदार अभिनयाने आणि सौंदर्याने तिने त्या काळात जोरदार यश मिळवले होते. आपल्या भूमिकेत जिवंतपणा आणण्यासाठी ती प्रयत्न करायची आणि तिच्या याच प्रामाणिक मेहनतीने चित्रपट यशस्वी होत होते. चित्रपट क्षेत्रात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या रतीची या क्षेत्रात झालेली एंट्री खूपच रंजक आहे.

हेही पाहा- सलमान सोबत बॉलिवूड मध्ये केलेले पदार्पण, मात्र सध्या विकेतेय घरोघरी जेवणाचे डब्बे | Pooja Dadwal

अभिनेत्री रती अग्निहोत्रीच्या घरच्यांचा तिच्या या कामाला विरोध होता. मात्र रती लहानपणापासून मॉडेलिंग करत होती. तिला अभिनय क्षेत्रात काम करण्याची इच्छा होती. त्यामुळेच ती घरच्यांचा विरोध झुगारून या क्षेत्रात करियर करायला लागली. तिने दाक्षिणात्य चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली. 1979 मध्ये आलेला ‘पुथिया वारपुगल’ हा तिचा पहिला चित्रपट ठरला. मात्र तिला खरी प्रसिध्दी ‘एक दुजे के लिए’ या चित्रपटातून मिळाली. या चित्रपटाने तिला रातोरात स्टार केले. या चित्रपटानंतर तिच्यामागे चित्रपटांची रांग लागली होती. रतीला या चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. या यशाने ती सर्वत्र प्रसिद्ध झाली. 1985 मध्ये आपल्या करिअरमध्ये यशस्वी ठरत असतानाच तिने उद्योजक अनिल विर्वानीसोबत लग्न केले. त्यांना एक मुलगा आहे तो सुद्धा अभिनय क्षेत्रात काम करतो. 2015 मध्ये रती अग्निहोत्रीने घटस्फोट घेतला.80 च्या दशकात या प्रतिभावान अभिनेत्रीने केलेल्या चित्रपटांची आजही चर्चा होत असते.

हेही वाचा –

हे देखील वाचा