अरे व्वा! रवीना टंडनसोबत पुन्हा झळकणार गोविंदा; अभिनेत्रीने फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी


बॉलिवूड इंडस्ट्रीला आज १०० पेक्षा अधिक काळ लोटला आहे. या एवढ्या वर्षांच्या काळात अनेक हिट आणि मोठ्या जोड्या आपण पहिल्या. या जोड्यांची अनेक काळ बॉक्स ऑफिससोबतच प्रेक्षकांच्या मनावरही राज्य केले. अगदी दिलीप कुमार- मधुबाला, शाहरुख- काजोल यांच्यापासून ते रणबीर- दीपिकापर्यंत अशा अनेक आयकॉनिक जोड्या आपण पडद्यावर पाहिल्या. यातलीच एक सुपरहिट आणि लोकप्रिय जोडी म्हणजे गोविंदा आणि रवीना टंडन. या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले, आणि सर्वच सिनेमे हिट झाले. ही जोडी म्हणजे ९० च्या काळात सिनेमा हिट होण्याची खात्री झाली होती.

मात्र, मागील काही काळापासून रवीना आणि गोविंदा दोघेही मोठ्या पडद्यापासून लांब आहेत. टेलिव्हिजनवर अनेक कार्यक्रमांमध्ये दिसणारी ही जोडी पुन्हा एकदा एकत्र चित्रपटात दिसावे अशी अनेकांची इच्छा होती. पण अशी कोणतीही शक्यता दिसून येत नव्हती. मात्र, रविवारी (४ जुलै) रवीनाने सोशल मीडियावर शेअर केलेली एक बातमी अनेकांना सुखद आणि आश्चर्याचा धक्का देऊन गेली. पडद्यापासून लांब असलेली रवीना सोशल मीडियावर भरपूर सक्रिय आहे. अशातच तिने एक पोस्ट केली आहे, जी सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरत आहे.

रवीनाने तिचे आणि गोविंदाचे काही फोटो पोस्ट केले असून तिने सांगितले आहे की, ती लवकरच गोविंदासोबत दिसणार आहे. अनेक चित्रपटांमध्ये दिसलेली ही हिट जोडी पुन्हा एकदा नवीन प्रोजेक्टच्या माध्यमातून समोर येणार आहे. याची शूटिंग पूर्ण झाली असून, लवकरच अनेक वर्षांनी ही जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे.

गोविंदासोबतचे फोटो पोस्ट करत रवीनाने लिहिले, “ग्रँड रियूनियन, आम्ही पुन्हा सोबत आलेलो आहोत. लवकरच आम्ही पडद्यावर परतणार आहोत. काय? कुठे? केव्हा? कधी? लवकरच येणार आहोत….#किसीडिस्कोमैजाये” रवीनाची ही पोस्ट तुफान व्हायरल होत असून, यावर फॅन्सदेखील भरपूर कमेंट्स करत आहेत. फॅन्स तिला आणि गोविंदाला पुन्हा सोबत बघण्यासाठी खूपच उत्साहित असण्याच्या कमेंट्स या पोस्टवर येत आहेत. या सर्व कमेंट्सवर रवीनाने ‘धीर धरा’ असा रिप्लाय दिला आहे.

गोविंदा आणि रवीनाने ९० च्या दशकात ‘दूल्हे राजा’, ‘आंटी नंबर १’, ‘अखियों से गोली मारे’, ‘वाह! तेरा क्या कहना’, ‘बडे मिया छोटे मिया’ आदी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.