Friday, July 5, 2024

‘टिप टिप बरसा…’ गाण्याच्या रिक्रिएशनमुळे रवीना टंडन नाराज; केले ‘असे’ काही की, सर्वत्र होतेये चर्चा

अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफ यांचा ‘सूर्यवंशी’ चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. देशभरात सध्या याच चित्रपटाची चर्चा चालू आहे. या चित्रपटात अजय देवगण आणि रणवीर सिंग हे देखील दिसत आहे. या तीन कलाकारांना एकत्र बघताना प्रेक्षकांना देखील खूप आनंद होत आहे. अशातच कॅटरिनाच्या नवीन गाण्याने सर्वत्र धमाल केली आहे. तिचे ‘टिप टिप बरसा पाणी’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. यावर प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन हिने तिची प्रतिक्रिया दिली आहे.

‘टिप टिप बरसा पाणी’ या गाण्याच्या मूळ गाण्यावर डान्स करून ९० च्या दशकात रवीना टंडनने सर्वांना वेड लावले होते. या गाण्याबाबत रवीनाने काही वक्तव्य केले नाही. परंतु तिने असे दोन ट्वीट लाईक केले आहेत. ज्यामुळे सध्या जोरदार चर्चा चालू आहे. त्या दोन्ही ट्वीटमध्ये ‘टिप टिप बरसा पाणी’ या मूळ गाण्याचे कौतुक केले आहे. हे नवीन गाणे प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांचे दोन गट पडलेले दिसत आहेत. सगळेजण त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. यातील दोन ट्वीट रवीनाने लाईक केले आहेत. (Raveena tandons reaction to katrina kaif’s recreated song tip tip barsa pani)

पहिल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, “ओरिजिनल ‘टिप टिप बरसा पाणी’ची गोष्टच काही वेगळी आहे आणि ती पण ९० च्या दशकाच्या सुरुवातीला.” यावर एका युजरने लिहिले की, “हे खरचं एक सुंदर व्हर्जन आहे. परंतु जुन्या गाण्याची सुंदरता जास्त होती.” दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “हे छान आहे, परंतु रवीना टंडनची बरोबरी कोणीही करू शकत नाही. जेव्हा मी हे गाणे ऐकतो तेव्हा सगळ्यात आधी माझ्या मनात रवीनाच येते.” आणखी एकाने लिहिले आहे की, “कॅटरिना चांगली आहे परंतु रवीना तिच्यापेक्षाही चांगली आहे.” असे काही ट्वीट रवीनाने लाईक केले आहेत.

रवीना टंडन आणि अक्षय कुमार यांच्या १९९४ मध्ये आलेल्या ‘मोहरा’ या चित्रपटात ‘टिप टिप बरसा पाणी’ हे गाणे प्रदर्शित झाले होते. हे गाणे अजूनही सगळे आवडीने ऐकतात. आता या गाण्याला ‘सूर्यवंशी’ चित्रपटात रिक्रिएट केले आहे. ज्यामध्ये अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफ दिसत आहे. या गाण्याला तनिष्क बागचीने रिमिक्स केले आहे आणि आवाज मूळ गायकांचाच आहे. या गाण्याचे मूळ गायक उदित नारायण आणि अलका याज्ञिक आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सूर्यवंशी’च्या प्रदर्शनानंतर नवीन गाणे लॉन्च, पाहायला मिळाली अक्षय कुमार अन् कॅटरिना कैफची दिलखेचक केमिस्ट्री

-भारीच ना! अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी केला ‘इतक्या’ कोटींचा टप्पा पार

-अरेरे! प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी लीक झाला ‘सूर्यवंशी’; निर्मात्यांमध्ये काळजीचे वातावरण

हे देखील वाचा