बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांनी अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. सुपरहिट गाण्यांमध्ये समावेश होतो तो म्हणजे ‘मोहरा’ या चित्रपटातील ‘टिप टिप बरसा पाणी’ या गाण्याचा. प्रेक्षकांनी त्यांच्या या गाण्याला आणि त्यांच्या जोडीला देखील खूप प्रेम दिले होते. आज देखील त्यांच्या या गाण्याचे अनेक दिवाने आहेत. रविनाने या गाण्यात जो डान्स केला होता, त्या डान्सने तिचे सगळे चाहते दिवाने झाले होते. हे गाणे सध्या सोशल मीडियावर ढोल ट्विस्ट सोबत मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या गाण्याला स्वतः रवीनाने देखील शेअर केले आहे. या सोबत हे ट्विस्ट तिला कसे वाटले हे सांगितले आहे.
रवीना टंडनने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जो व्यक्ती ढोल वाजवत आहे तोच व्यक्ती हे गाणे म्हणत आहे. रवीनाला हा व्हिडिओ खूपच आवडला आहे. तसेच तिचे चाहते देखील हा व्हिडिओ मोठ्या संख्येने शेअर करत आहेत. रवीनाने हा व्हिडिओ शेअर करून लिहिले आहे की, “हे व्हर्जन मला खूपच आवडले आहे, ढोल मिक्स.” जेव्हा तिने हा व्हिडिओ शेअर केला त्यानंतर तिच्या चाहत्यांनी देखील हा व्हिडिओ शेअर केला. अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांच्या गाण्याचे हे व्हर्जन प्रेक्षकांना खूपच आवडले आहे.
Love this version ♥️ #dholmix https://t.co/NAm32WmmDq
— Raveena Tandon (@TandonRaveena) May 8, 2021
एका युजरने रवीना टंडनच्या या व्हिडिओवर लिहिले आहे की, “एकदम मस्त ढोलवाल्याने जे गाणे निवडले आहे ते खूपच शानदार आहे. दुसरं म्हणजे ज्याप्रकारे त्याने ढोलच्या बिटला मॅच केले आहे. ते कौतुकास्पद आहे. माझ्याकडे आता शब्द नाहीयेत, खूप छान.”
दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे की, “90 चे दशक हा भारतीय संगीत क्षेत्रातील सुवर्ण काळ होता. धन्यवाद रविना आम्हाला एवढी चांगली गाणी दिल्याबद्दल.”
‘सूर्यवंशी’ या चित्रपटात अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांचे हे गाणे रिक्रिएट केले आहे. परंतु हा चित्रपट अजून प्रदर्शित झालेला नाहीये. अक्षय कुमार या गाण्यात देखील चांगलेच ठुमके मारताना दिसणार आहे. या गाण्यात तो
कॅटरिना कैफसोबत दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-बोल्डनेसचा तडका! अमेरिकन मॉडेल किम कर्दाशियानचे बोल्ड फोटो व्हायरल, वाढला सोशल मीडियाचा पारा