Saturday, September 7, 2024
Home टेलिव्हिजन टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील ‘या प्रसिद्ध अभिनेत्याची पाहा कशी झाली अवस्था, वाचा काय आहे यामागे कारण

टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील ‘या प्रसिद्ध अभिनेत्याची पाहा कशी झाली अवस्था, वाचा काय आहे यामागे कारण

टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेता म्हणून रवी दुबईला ओळखले जाते. तो मागील अनेक वर्षांपासून या क्षेत्रामध्ये सक्रिय आहे. त्याने टीव्हीवर अनेक यशस्वी आणि हिट शो केले आहेत. दिलीप कुमार आणि सायरा बानो यांच्या ‘स्त्री… तेरी कहानी’ या मालिकेपासून त्याने त्याच्या करियरला सुरुवात केली. त्यानंतर तो ‘डोली सजा के’ मध्ये दिसला मात्र त्याला खरी ओळख मिळाली ती ‘जमाई राजा’ या मालिकेनंतर. पुढे तो ‘सास बिना ससुराल’, ‘नच बलिये’, ‘कॉमेडी सर्कस’, ‘खतरों के खिलाड़ी’ आदी अनेक शोमध्ये दिसला. सोबतच त्याने त्याचे प्रोडक्शन हाऊस देखील सुरु केले. या सर्वांमध्ये तो आता त्याच्या आगामी ‘फैराडे’ या सिनेमासाठी खूपच चर्चेत आहे.

नुकतेच रवीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर दोन फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो पोस्ट केल्यानंतर लगेच व्हायरल झाले. रवीने शेअर केलेल्या फोटोमध्ये एकीकडे त्याचा फोटो आहे, तर दुसरीकडे त्याचा ‘फैराडे’ सिनेमातील लूक आहे. या दोन्ही फोटोंमध्ये तुलना करताच येणार नाही. कारण त्यात अतिशय मोठा फरक आहे. ‘फैराडे’ मधील लूक पाहून तुम्ही ओळखूच शकणार नाही की, तो रवी आहे आणि त्याचे वय केवळ ३९ वर्ष आहे. त्याचा लूक पाहून आता लोकांना त्याची भूमिका पाहण्याची उत्सुकता अधिकच वाढत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ravie Dubey (@ravidubey2312)

रवी दुबेचा हा लूक पाहून सोशल मीडियावर तर त्याचे कुटून कार्याला नेटकऱ्यांना शब्दच अपुरे पडत आहे. लोकांनी त्याचे कौतुक करत अनेक कमेंट्स सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत. एकाने लिहिले, “क्या बात आहे सर”, दुसऱ्याने लिहिले, “समर्पणाचे दुसरे नाव रवी दुबे” यासोबतच अनेकांनी हार्ट ईमोजी देखील पोस्ट केल्या आहेत. त्याचा लूक पाहून आता लोकांना सिनेमाबाबत अधिकच उत्सुकता निर्माण झाली आहे.

दरम्यान रवी दुबेचा ‘फैराडे’ हा सिनेमा येत्या डिसेंबर महिन्यात प्रकशित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती स्वतः रवी आणि त्याची पत्नी सरगुण करत आहे. तत्पूर्वी या सिनेमाआधी या दोघांनी अनेक टेलिव्हिजन मालिकांची देखील निर्मिती केली आहे. यात ‘उड़ारियां’ आणि ‘जुनूनियत’ या हिट मालिकांचा देखील समावेश आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
काय सांगता! ‘या’ मराठी अभिनेत्रीने वयाच्या पन्नाशीमध्ये बांधली पुन्हा लगीनगाठ, व्हिडिओ झाला व्हायरल

माधुरीने आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा केला वाढदिवस; म्हणाली, “निस्वार्थी निखळ मुलांमध्ये…”

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा