Sunday, May 19, 2024

तुषार बघायचा करीनाची 12-14 तास वाट, स्टारकिड असूनही केले हाेते दुर्लक्षित

एखादा स्टार किड जेव्हा चित्रपटसृष्टीत प्रवेश करतो, तेव्हा त्याच्यासाठी सर्व काही सोपे आहे, असे सामान्यतः मानले जाते. चित्रपट मिळणे कदाचित सोपेही असेलही, पण एक स्थान आणि ओळख निर्माण करण्यासाठी त्यांना बाहेरच्या व्यक्ती इतकीच मेहनत घ्यावी लागते. यावर तुषारचे ही असेच काही मानने आहे. तुषारने एका मुलाखतीत स्टार किड विषयी खुलासा केला. त्याच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक स्टार किडकडे करीना कपूर सारखे लक्ष दिले जात नाही. 

शूटींगसाठी तुषार 12 ते 14 तास करीनाची पाहायचा वाट
मुलाखतीत तुषार कपूर (tusshar kapoor) याला स्टार किड म्हणून इंडस्ट्रीत स्थान निर्माण करण्याबाबत प्रश्न विचारला. यावर तुषारने स्वत:ला बाहेरचा व्यक्ती असल्याचे सांगितले. तुषार म्हणाला की, “प्रत्येक स्टार किडसाठी रेड कार्पेट टाकलेच असे नाही. जेव्हा मी माझ्या पहिल्या चित्रपट ‘मुझे कुछ कहना है’चे शूटिंग करत होतो, तेव्हा मी माझी सहकलाकार करीना कपूरची 12 ते 14 तास वाट पाहत बसायचो. करीना एकाच वेळी चार चित्रपटांचे शूटिंग करत होती. तिचा पहिला चित्रपट रिलीज व्हायच्या आधीच इंडस्ट्रीत तिची माेठी मागणी वाढली होती आणि तिने अनेक चित्रपट साइन केले होते.”

तुषारने घेतला सिंगल फादर बनण्याचा निर्णय
तुषार कपूरने सिंगल फादर बनण्याचा निर्णय घेतला तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मुलाखतीत त्याल त्यांच्या पुस्तकावर प्रश्न विचारण्यात आला. यावर तुषार म्हणाला, “मी जेव्हा हा निर्णय घेतला तेव्हा सगळे मला विचारत होते की, मी हे का केले? अशा परिस्थितीत मी एक पुस्तक लिहिण्याचा निर्णय घेतला, ज्यामध्ये मला सिंगल फादर या निर्णयाबद्दल बोलायचे होते.” यावर तुषार पुढे म्हणाला, “कोणीही दत्तक घेऊ शकतो. विवाहित जोडपे देखील असे करतात. मग मला माझे स्वतःचे मूल हवे असेल तर मला याबद्दल मोकळीक का नाही? माझ्याकडे वेळ नसल्यामुळे फक्त आयाच माझ्या मुलाची काळजी घेतील असंही लोकांना वाटतं. पण हे खरे नाही.”

‘गायब’ चित्रपटासाठी तुषार कपूरचे काैतुक
तुषार कपूरने त्याच्या करिअरची सुरुवात 2001 साली त्याच्या ‘मुझे कुछ केहना है’ या चित्रपटातून केली. या चित्रपटात त्याच्यासोबत करीना कपूर होती. या चित्रपटासाठी त्याला बेस्ट डेब्यू अवॉर्ड मिळाला होता. यानंतर त्याने ‘क्या दिल ने कहा’, ‘ये दिल’, ‘जिना सिर्फ मेरे लिये’ आणि ‘कुछ तो है’ या चित्रपटात काम केले आहे. परंतु त्याचे हे सगळे चित्रपट फ्लॉप झाले होते. एवढे सगळे चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर त्याने 2004 मध्ये ‘गायब’ या चित्रपटात काम केले. या चित्रपटसाठी त्याचे खूप कौतुक झाले. त्याच्या कामाची इंडस्ट्रीमध्ये चर्चा चालू झाली. यानंतर त्याने रोहित शेट्टीच्या ‘गोलमाल’ या चित्रपटात काम केले. त्याचा हा चित्रपट ब्लॉकबस्टर झाला होता. गाेलमाल चित्रपटाच्या पुढच्या दोन सिक्वेलमध्ये देखील त्याने काम केले. या नंतर त्याच्या करिअरचा आलेख उंचावत गेला. (Read the interesting story of actress Kareena Kapoor waiting 12-14 hours to watch Tushar)

आधिक वाचा-
मिलिंद गवळी यांच्या शिवकालीन किल्ल्यांविषयीच्या पोस्टनं वेधलं लक्ष, म्हणाले, ‘मुलांना इतिहास…’
करण जोहर ते तुषार कपूर, ‘हे’ सेलिब्रिटी आहेत सिंगल डॅड: एकदा वाचाच

हे देखील वाचा