बाबू अँटनीबद्दल तुम्ही ऐकलंय का? पुण्यात शिकलेल्या ‘या’ माणसाने जगभरात उंचावले भारताचे नाव


भरथनच्या ‘चिलंपू’ या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरवात करणारे बाबू अँटनी एक भारतीय अभिनेता आणि मार्शल आर्टिस्ट आहेत, जे मुख्यतः मल्याळम चित्रपटात काम करतात. सोबतच त्यांनी तेलुगू, कन्नड, हिंदी, बंगाली आणि इंग्रजी चित्रपटात काम केले आहे. ह्युस्टननध्ये त्यांची मार्शल आर्ट अकादमी आहे. आज त्यांचा ५५वा वाढदिवस. प्रसिद्धीपासून स्वतःला दूर ठेवणाऱ्या याच बाबू अँटनी यांच्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत…

– त्यांचा जन्म केरळमधील पोनकुन्नम येथे झाला. पुण्यातील ‘सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटमधून’ एमबीएचे शिक्षण घेतले. त्यानंतर पुण्यातील फिल्म आणि टेलिव्हिजन ऑफ इंडिया या संस्थेमध्ये सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केले, ज्यामुळे त्यांचा चित्रपट क्षेत्रात प्रवेश झाला.

– रशियन अमेरिकन एव्हगेनिया सोबत त्यांचे लग्न झाले. ह्या जोडप्याला आर्थर आणि एलेक्स अशी दोन मुलं आहेत. आजकाल ते चित्रपटांपासून दूर राहून आपल्या अकादमीवर जास्त लक्ष केंद्रित केले आहे. त्यांनी आपल्या मुलांना देखील मार्शल आर्टमध्ये प्रशिक्षण दिले आणि आर्थर याला एमएमएमध्ये पहिला ब्लॅक बेल्ट मिळाला होता. अलीकडेच त्यांनी आपल्या सोशल अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये ते आपल्या मुलांना अतिशय खतरनाक प्रशिक्षण देताना दिसत आहेत.

– भरथनच्या चिलंपू या चित्रपटातून त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. त्यांनी मल्याळम, तामिळ, तेलुगू, कन्नड, हिंदी, इंग्रजी आणि सिंहलीमधील १६० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या खलनायकी भूमिकेमुळे त्यांचा चाहतावर्ग मोठा आहे

– त्यांचे वैशाली, अपराहनम आणि उप्पूकंदम ब्रदर्स हे त्यांच्या करियर मधील सर्वात महत्वाचे चित्रपट आहेत.

– त्यांचे काही चित्रपट हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महोत्सवात देखील झळकले आहेत.

-सन २०१९ नंतर ते चित्रपटत क्षेत्रातून गायब झाले होते. त्यांचा शेवटचा चित्रपट हा ‘ बुलेट्स ब्लेड अँड ब्लड’ हा होता, जो एक इंग्रजी चित्रपट आहे.

– अभिनयासोबतच ते आपल्या व्यक्तिमत्वावर देखील विशेष लक्ष ठेवतात. सोबतच नवनवीन गोष्टी शिकण्यास देखील त्यांना खूप आवडतात. त्याचप्रमाणे ते एक उत्तम घोडेस्वार सुद्धा आहेत.

– २९ डिसेंबर २०२१ ला प्रदर्शित होणाऱ्या ‘रावलीला चरित्रा’ या चित्रपटातून ते पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत.

– शत्रु, प्रणामम, वृथम, जेबु डोंगा, हत्या, वैसाली, न्यू इयर, अंजली, लॉरी ड्रायव्हर, शांती क्रांती गंधारी, एयरपोर्ट, नेथाजी, कॅप्टन, शंभू, इझ्रा इत्यादी चित्रपटात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.


Leave A Reply

Your email address will not be published.