Monday, October 14, 2024
Home साऊथ सिनेमा धनुष अन् ऐश्वर्याचं वेगळं होण्याचं कारण आलं समोर, अभिनेत्याच्या वडिलांनीच केला मोठा खुलासा!

धनुष अन् ऐश्वर्याचं वेगळं होण्याचं कारण आलं समोर, अभिनेत्याच्या वडिलांनीच केला मोठा खुलासा!

दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषने (Dhanush) अलीकडेच पत्नी ऐश्वर्या रजनीकांतसोबतचे लग्न मोडल्याची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचा धक्का दिला. धनुष आणि ऐश्वर्याने १७ जानेवारीला सोशल मीडियावर संयुक्त निवेदन जारी केले. यामुळे त्यांच्या चाहत्यांनाही चांगलाच धक्का बसला. दोघांच्या या निर्णयामुळे केवळ चाहतेच नाही, तर त्यांचे कुटुंबीयही दु:खी झाले आहेत.

ऐश्वर्याचे वडील रजनीकांत (RaJinikanth) यांनी अद्याप या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र धनुषचे वडील आणि तमिळ चित्रपट निर्माते कस्तुरी राजा यांनी या घटस्फोटावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, “धनुष आणि ऐश्वर्याचे नाते काही मुद्द्यांवरून मतभेद झाल्यामुळेच तुटले. हा घटस्फोट नसून प्रत्येक विवाहित जोडप्यात होणारे घरगुती भांडण आहे. धनुष आणि ऐश्वर्या सध्या चेन्नईत नाहीत. दोघेही हैदराबादमध्ये आहेत. मी त्याच्याशी फोनवर बोललो आहे आणि त्यांना काही सल्लाही दिला आहे.”

धनुष आणि ऐश्वर्याने त्यांच्या संयुक्त निवेदनात लिहिले की, “आम्ही मित्र, जोडपे, पालक आणि शुभचिंतक म्हणून १८ वर्षे एकत्र घालवली. हा प्रवास वाढीचा, समजूतदारपणाने, समायोजनाचा होता. आता आम्ही या टप्प्यावर उभे आहोत जिथून आमचे जीवन वेगळे होत आहे. आम्ही एक जोडपे म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून आम्हाला स्वतःला समजून घेण्यासाठी थोडा वेळ मिळेल. या निर्णयाचा आदर करा आणि त्यावर मात करण्यासाठी आम्हाला थोडी गोपनीयता द्या.”

हे विधान शेअर करताना ऐश्वर्याने ट्विटरवर लिहिले की, “कॅप्शनची गरज नाही, फक्त तुमचे प्रेम आणि समजची गरज आहे.” तसेच, धनुष आणि ऐश्वर्याला दोन मुलं असून, त्यांची नावे यात्रा आणि लिंगा अशी आहेत.

हेही वाचा :

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा