Monday, July 1, 2024

एकता कपूरच्या तगड्या प्लॉनिंगमुळे गाजला लॉकअप शोचा पाहिला सिझन, कंगना देखील ठरते कौतुकास पात्र

बघता बघता कंगणा रणौतच्या (Kangana Ranaut) ‘लॉकअप’ कार्यक्रमाला निरोप देण्याची वेळ आली आहे. लवकरच या कार्यक्रमाचा ग्रेंड फिनाले होणार आहे. त्यामुळे आता हा कार्यक्रम अंतिम टप्प्यात आला आहे. मात्र या कार्यक्रमाने महिनाभर प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन केले. कार्यक्रमातील अतरंगी स्पर्धक आणि त्यांच्याबद्दलच्या समोर येणाऱ्या विविध रंजक बातम्या यामुळे कार्यक्रम नेहमीच प्रेक्षकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदु राहिला. आता हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे त्याआधी पाहूया या कार्यक्रमाला हिट करण्यासाठी निर्मात्यांनी आखलेल्या अनोख्या योजनांबद्दल.

अल्ट बालाजी आणि एमएक्सवर प्रदर्शित होण्यापूर्वीच लॉक अपची तुलना सलमान खानच्या बिग बॉस कार्यक्रमाशी केली जात होती. पण एकता कपूरने दावा केला की तिचा कार्यक्रम बाकीच्या रिअलिटी कार्यक्रमांपेक्षा खूपच वेगळा आहे, जो समोर होताच धमाल करेल. एकता कपूरने या कार्यक्रमासाठी कंगनाची निवड केली, कारण तिला माहित होते की लॉक अपसाठी कंगनापेक्षा चांगली होस्ट कोणीच असू शकत नाही. आणि अगदी तसंच झालं. कंगनाने एकताच्या अपेक्षांवर तिच्या कामाची मोहोर उमटवली आणि हा शो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. लॉक-अप हिट होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याची वेगळी संकल्पना. कार्यक्रमातील धक्कादायक खुलाशांनी चाहत्यांना त्यांच्याशी जोडून ठेवले. एलिमिनेशन टाळण्यासाठी, सेलिब्रिटी स्पर्धक त्यांच्या आयुष्यातील रहस्ये उघड करत राहिले आणि कार्यक्रमाचे चाहते ते ऐकत राहिले.

धक्कादायक खुलाश्यां व्यतिरिक्त, कंगना राणौतचा स्पर्धकांबद्दलचा दृष्टिकोन देखील आश्चर्यकारक होता. कंगना शोमध्ये चुका करणाऱ्यांना फटकारताना दिसली. कधी कधी त्यांच दुःख जाणून ती भावूक होताना दिसली. शोमध्ये कंगनाने एक नाही तर अनेक वेगवेगळ्या छटा दाखवल्या.करण कुंद्राच्या एन्ट्रीचाही कार्यक्रमाला खूप फायदा झाला. ज्या आठवड्यात करण कुंद्रा या शोमध्ये जेलर म्हणून दाखल झाला, तेव्हापासून शोच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. लॉक अप हिट करण्यासाठी, एकता कपूरने शोच्या स्पर्धकांची देखील काळजीपूर्वक निवड केली. स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी असो किंवा सोशल मीडिया स्टार अंजली अरोरा असो सगळ्यांचीच निवड योग्य होती. त्यामुळेच हा कार्यक्रम चांगलाच गाजला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा