×

Dil Dimag Aur Batti Movie Review : निखळ मनोरंजनाचा डोस घेण्यासाठी एकदा तरी पाहाच, ‘दिल, दिमाग और बत्ती’

चित्रपट म्हणजे मनोरंजन असतं आणि थिएटरमध्ये येणारा प्रत्येक प्रेक्षक चित्रपट बघताना हीच अपेक्षा बाळगतो. तुम्हीही सध्या एखादा नवीन सिनेमा पाहण्याचा काही प्लॅन करत असाल, तर नुकताच ६ मे रोजी रिलिज झालेला ‘दिल, दिमाग और बत्ती’ हा सिनेमा तुमचं मनोरंजन करण्यासाठीचा उत्तम पर्याय आहे.

फूल टू फिल्मी स्टाईल धमाल म्हणजे दिग्दर्शक हृषिकेश गुप्ते (Hrishikesh Gupte) यांचा दिल, दिमाग और बत्ती ( Dil Dimag Aur Batti ) हा चित्रपट. या चित्रपटाच्या माध्यमातून गुप्ते यांनी एक आगळा वेगळा प्रयोग केला आहे. आणि त्यांचा हा प्रयोग बऱ्यापैकी यशस्वी झाल्याचे दिसत आहे. मराठी सिनेक्षेत्रातील आघाडीच्या एकापेक्षा एक कलाकारांचा सहभाग आणि त्यांचा दर्जेदार अभिनय ही ‘दिल, दिमाग और बत्ती’ चित्रपटाची जमेची बाजू. (Dil Dimag Aur Batti Marathi Movie Review)

View this post on Instagram

A post shared by Rushikesh Gupte (@rushikesh_gupte)

चित्रपटाचे नायक मनमोहन देसाई म्हणजेच दिलिप प्रभावळकर यांच्या माध्यमातून सिनेमाची कथा सुरू होते. मनमोहन हे नाव बदण्यासाठी ते न्यायालयाची पायरी चढतात आणि इथूनच सिनेमाची खरी गोष्ट सुरू होते. देसाईंची मुलगी जया ही अमिताभला जेव्हा गरोदर असल्याची गोड बातमी देते, तेव्हा आनंदाच्या भरात नाचताना केळ्याच्या सालीवरून घसरून अमिताभ पडतो. त्याच्या डोक्याला मार लागतो. दोन मुले आणि एक मुलगी असे जयाला तिळे होते. या तिघांची ताटातूट झालेली असते. जावई अमिताभ हरवल्याची तक्रार घेऊन देसाई पोलीस स्टेशनमध्ये जातात. जावयाचा शोध घेण्याच्या प्रयत्नांत ताटातूट झालेली भावंडे सापडतात.

चित्रपटाच्या पटकथेची मांडणी उत्तम असून विविध घटना आणि त्या अनुषंगाने समोर येणारे कॅरेक्टर्स प्रेक्षकांची उत्सुकता वाढवतात. दिग्दर्शक हृषिकेश गुप्ते यांची दिल, दिमाग और बत्तीच्या रुपाने मराठी सिनेक्षेत्रात एक उत्तम कलाकृती केली आहे.

हेही वाचा – आता ८० च्या दशकातील सुवर्णकाळ पुन्हा एकदा अनुभवता येणार, ‘दिल दिमाग और बत्ती’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

सोनाली कुलकर्णी, दिलीप प्रभावळकर, वंदना गुप्ते, पुष्कर श्रोत्री, किशोर कदम या कलाकारांनी त्यांच्या अभिनय आणि संवाद फेकण्याच्या खास शैलीने चित्रपटातील प्रत्येक प्रसंग डोळ्यात भरेल असा साकारला आहे. चित्रपटातील गाणी प्रेक्षकांना जागेवर थिरकायला लावतील अशी आहे. कॅमेरा, फ्रेम, शूट साईट, वेशभूषा आणि इतर तांत्रिक बाबी अगदी उत्तम दर्जाच्या आहेत.

चित्रपटाच्या सकारात्मक बाजूबद्दल बोलायचे झाल्यास कलाकारांचा अभिनय ही सर्वात जमेची बाजू आहे. दिलीप प्रभावळकर, सोनाली कुलकर्णी यांनी साकारलेली कॅरेक्टर्स जबरदस्त वाटतात. वैभव मांगले यांनीही त्यांच्या भुमिकेला न्याय दिला आहे.

वंदना गुप्तेंनी साकारलेली दरोडेखोराची भुमिका, अमिताभ म्हणून पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे यांनी चित्रपटात साकारलेला दिग्दर्शक या भुमिका सलाम करायला लावणाऱ्या आहेत. तसेच संस्कृती बालगुडेच्या डान्स आणि गाण्याने अक्षरशः धमाल केली आहे. एकंदरित मनोरंजनाचा आस्वाद घ्यायचा असेल तर एकदा तरी ‘दिल, दिमाग और बत्ती’ थिएटरात पाहायलाच हवा.

चित्रपटातील कलाकार : सोनाली कुलकर्णी, दिलीप प्रभावळकर, वंदना गुप्ते, पुष्कर श्रोत्री, किशोर कदम, आनंद इंगळे, वैभव मांगले, सागर संत, मयुरेश पेम, संस्कृती बालगुडे, सखी गोखले, पुष्कराज चिरपुटकर, रेवती लिमये, मेघना एरंडे, संजय कुलकर्णी, विनीत भोंडे

चित्रपटाचे निर्माते : सा क्रिएशन्स

चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक, गीतकार : हृषीकेश गुप्ते

चित्रपटाचा कालावधी : २ तास १० मिनिटे

( Dil Dimag Aur Batti Marathi Movie Review )

अधिक वाचा

‘दिल, दिमाग और बत्ती’ चित्रपटातून अभिनेता सागर संत याचे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण

दमदार कलाकार अन् सुपरहीट गाण्यांमुळे चर्चेत येतोय ‘दिल दिमाग और बत्ती’ चित्रपट

Latest Post