Sunday, December 3, 2023

लग्नाच्या 6 महिन्यातच रेखा यांनी पती मुकेशकडे मागितला होता घटस्फोट, ‘या’ कारणामुळे पतीने केली होती आत्महत्या

बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री रेखा केवळ तिच्या अभिनयासाठीच प्रसिद्ध नाही तर या वयातही तिला तिच्या सौंदर्यामुळे खूप प्रशंसा मिळत आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर लाखो हृदयांवर राज्य करणाऱ्या रेखाचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेचा विषय होते. रेखाने 1990 मध्ये बिझनेसमन मुकेश अग्रवालसोबत लग्न करून घर स्थायिक केले होते. रेखाच्या बायोग्राफी ‘रेखा: द अनटोल्ड स्टोरी बाय यासर उस्मान’मध्ये रेखाच्या वैयक्तिक आयुष्यावर अनेक गोष्टी आहेत.

या पुस्तकानुसार रेखा तिची मैत्रीण आणि फॅशन डिझायनर बिना रमानी यांना भेटण्यासाठी अनेकदा दिल्लीला जात असे. ती बीनाशी अनेकदा बोलायची की आता तिला आयुष्यात स्थिरावायचं आहे. बिना रमानी यांनीच मुकेश अग्रवाल आणि रेखा यांना पहिल्यांदा भेटायला लावलं होतं. हळू हळू दोघेही बोलू लागले. अनेकवेळा फोनवर बोलल्यानंतर दोघांनी मुंबईत भेटण्याचे मान्य केले. रेखाला मुकेशचा प्रामाणिकपणा खूप आवडला. दोघांची भेट होऊन एक महिनाच झाला होता की मुकेशने रेखाला लग्नासाठी प्रपोज केले होते. रेखानेही क्षणाचाही विलंब न लावता हो म्हटलं.

मुकेश अग्रवाल आणि रेखा यांचे लग्न मार्च 1990 मध्ये मुंबईतील जुहू येथील एका मंदिरात झाले. लग्नानंतर महिनाभरानंतर त्यांनी तिरुपती मंदिरात लग्नाचा कार्यक्रम ठेवला. आठवडाभरानंतर रेखाला मुकेशचे वेगळे रूप पाहायला मिळाले. लग्नानंतर मुकेशला व्यवसायात तोटा होऊ लागला, रेखाही त्यामुळे तणावात राहायची. दुसरीकडे रेखाने बॉलिवूड सोडून दिल्लीत राहावे, अशी मुकेशची इच्छा होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश डिप्रेशनमध्ये गेला होता. रेखाही या लग्नावर खूश नव्हती. एक वेळ अशी आली जेव्हा दोघांनी एकमेकांशी बोलणे बंद केले आणि लग्नाच्या ६ महिन्यांनंतर रेखाने घटस्फोटाची मागणी केली. त्यानंतर 1990 मध्ये रेखाचे पती मुकेश अग्रवाल यांनी आत्महत्या केली. मुकेशच्या मृत्यूनंतर रेखालाही मीडिया ट्रायलला सामोरे जावे लागले. त्यावेळी रेखाला नॅशनल व्हॅम्प ही पदवीही देण्यात आली होती.

हेही वाचा-
रुपाली भोसलेच्या ‘त्या’ पोस्टवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट; म्हणाले, ‘घोड्याचा लगाम धरून ठेवा, नाहीतर…’
लहानपणी जेष्ठ अभिनेत्री रेखा यांना ‘या’ कारणासाठी वाटायचा त्यांच्या बहिणींचा हेवा

हे देखील वाचा