Sunday, December 3, 2023

लहानपणी जेष्ठ अभिनेत्री रेखा यांना ‘या’ कारणासाठी वाटायचा त्यांच्या बहिणींचा हेवा

रेखा बॉलिवूडमधील एव्हरग्रीन अभिनेत्री. बॉलिवूडच्या सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक म्हणून रेखा यांची गणना केली जाते. रेखा यांनी त्यांच्या उत्तम अभिनयाच्या जोरावर, नृत्याच्या आणि सौंदर्याच्या जोरावर अनेक दशकं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. आजही रेखा यांच्या सौंदर्याची जादू अजिबात ओसरलेली नाही. कोणत्याही पिढीतील लोकांना रेखा अगदी सहज आपलेसे करून घेतात. आजच्या पिढीला देखील त्यांच्या डान्सने भुरळ घातली आहे. मात्र तुम्हाला ही गोष्ट ऐकून नवल वाटेल की लहान असताना रेखा यांना त्यांच्या बहिणीच्या सौंदर्याचा हेवा वाटायचा.

रेखा यांनी वयाच्या 13 व्या वर्षी चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी सतत चित्रपटांमधून काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यांनी त्यांच्या अभिनयाने अनेक दशकं खऱ्या अर्थाने राज्य केले. ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘उमराव जान’, ‘खूबसूरत’, ‘खून भरी मांग’, ‘सिलसिला’ आदी अनेक सुपरहिट चित्रपट त्यांनी दिले. आज रेखा नाव जरी उच्चारले तरी डोळ्यासमोर येते ते अवर्णनीय असे सौंदर्य. सौंदर्य हीच रेखा यांची ओळख आज बनली असली तरी त्या स्वतःला लहान असताना कमी सुंदर समजायच्या आणि त्यांच्या बहिणींना सुंदर समजायच्या. हा किस्सा त्यांनी स्वतःचा एका मुलाखतीमध्ये सांगितला होता.

रेखा यांनी मुलाखतीमध्ये सांगितले की, “लहानपणी मी दोन गोष्टींमुळे सतत चिंतेत असायची. एकतर शाळेतील गृहपाठ आणि दुसरे म्हणजे माझ्या बहिणींमुळे. मला नेहमीच माझ्या बहिणींचे सौंदर्य पाहून त्यांचा खूपच हेवा वाटायचा. त्यांच्यासमोर मी नेहमीच स्वतःला कमी सुंदर समजायची, आणि विचार करायची की मी माझ्या बहिणींपेक्षा कमी सुंदर का आहे?”

rekha
rekha

जेव्हा रेखा यांनी बॉलिवूडमध्ये त्यांच्या त्यांच्या करिअरची सुरुवात केली तेव्हा त्यांना खूप समस्यांना तोंड द्यावे लागले. रेखा यांना त्यांच्या सावळ्या रंगावरून त्यांचे सहकलाकार देखील टोमणे मारायचे. मात्र रेखा यांनी हार न मानता सतत काम केले आणि लोकांच्या मनात जागा निर्माण केली. आज त्यांना बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री आणि एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणून ओळखले जाते.

हेही वाचा –
रुपाली भोसलेच्या ‘त्या’ पोस्टवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट; म्हणाले, ‘घोड्याचा लगाम धरून ठेवा, नाहीतर…’
‘फिमेल डॉन’पासून ते ‘उमराव जान’पर्यंत, या सदाबहार पात्रात रेखाजींनी जिंकलीयेत प्रेक्षकांची मने

हे देखील वाचा