अभिनेत्री रेखाच्या ओढणीन गळफासू लावून पतीने केली होती आत्महत्या, ६ महिन्यात मोडला होता संसार


आपल्या सौंदर्याने आणि अदाकारीने बॉलिवूडमध्ये नावाजलेली अभिनेत्री म्हणजे रेखा. तिने अनेक चित्रपटांमध्ये केलेले काम प्रेक्षकांच्या मनावर आजही कोरलेले आहे. वयाच्या अवघ्या 3 वर्षापासूनच तिने चित्रपटात सृष्टीत काम करायला सुरूवात केली होती. रेखाचा जन्म चेन्नई येथे 10 ऑक्टोंबर 1954 साली झाला आहे. तीच खरंं नाव भानुरेखा असे आहे.

रेखाला वादविवाद करायला खूपच आवडतात आणि तिला या गोष्टीची अजिबात पर्वा नसते की,लोक तिच्याबद्दल काय विचार करतील. ती असं म्हणते की, लग्नाच्या बाबतीत तिचे आणि तिच्या आईचे नशीब सारखेच आहे. ती म्हणते की,” माझं दुर्भाग्य तर बघा, माझ्या हातावर ना प्रेमाची रेषा आहे ना लग्नाची. माणूस नेहमीच आशा लावून बसतो, आणि त्याच प्रेम त्याला मिळण्याआधीच त्याच्या हातातून निसटून जाते.”

रेखाचे वडील साऊथचे एक नावाजलेले अभिनेता होते. ‘जैमिनी गणेशन’ हे त्यांचं नाव. त्यांना त्याकाळी सगळे किंग ऑफ रोमान्स असे संबोधत असत. तसेच आईचे नाव पुष्पांजली असे होते. ती देखील खूप प्रसिद्ध अभिनेत्री होती. परंतु तिच्या नवऱ्याने तिला सोडून दिले आणि दुसरे लग्न केले. त्यामुळे रेखा तिच्या वडिलांवर खूपच नाराज होती. तीचं खर नाव भानूरेखा गणेशन हे होते.परंतु तिने तिच्या नावासमोर कधी तिचे आडनाव लावले नाही.

ही गोष्ट तर सगळ्यांच माहित असेल की, रेखा‌‌ ही महानायक अमिताभ बच्चनवर खूप प्रेम करायची. परंतु ते दोघे कधीही एकमेकांचे होऊ शकले नाहीत. एका लग्न झालेल्या माणसावर प्रेम केल्यामुळे रेखाला सगळे खूपच बोलू लागले. अमिताभ बच्चन यांचं आधीच जयासोबत लग्न झाले होते. एका इंटरव्ह्यूमध्ये रेखाला विचारले होते की, एकत्र काम करताना तुम्हाला कधी अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम नाही झाले का? तेव्हा तिने उत्तर दिले की, हो” मी त्यांच्यावर खूप प्रेम करते”.

रेखा म्हणते की,” मी माझ्या आयुष्यात एकही व्यक्ती अशी बघितली नाहीये की, जे अमिताभ यांच्यावर प्रेम करत नाही, मग त्यातून तुम्ही मला कसे वगळू शकता. मी या गोष्टीला कसा नकार देऊ की, मी त्यांच्यावर प्रेम करत नाही.”

अमिताभ बच्चन यांच्या सोबतच्या प्रेमाचा शेवट झाल्यानंतर रेखाची भेट 1990 मध्ये दिल्लीतील बिझनेसमन मुकेश अग्रवाल यांच्यासोबत झाली. ‘आनन फानन’मध्ये दोघांनीही एकमेकांसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्या दोघांनी जुहूच्या मुक्तेश्वर मंदिरामध्ये लग्न केले. परंतु त्या दोघांचे लग्न जास्त दिवस नाही टिकू शकले. लग्नानंतर दोन महिन्यांनी रेखाने दिल्लीला जाणे कमी केले.

मुकेश यांना असे वाटत होते की, रेखाने चित्रपटात काम करणे सोडून द्यावे. परंतु ती आपले करिअर सोडू शकत नव्हती. लग्नाच्या सहा महिन्यांनंतर तिने कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. याचा मुकेशवर इतका वाईट परिणाम झाला की, त्याने डिप्रेशनमध्ये येऊन रेखाच्याच ओढणीने गळफास लावून घेतला. सुसाईड केल्यानंतर रेखाचा शेषनाग चित्रपट प्रदर्शित झाला होता. १९९० साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाच्या पोस्टरवर काळे फासण्यात आले होते. तसेच रेखाबद्दल अनेक वाईट गोष्टी बाहेर बोलल्या जात होत्या. या काळात तिच्याबद्दल अनेक गोष्टी लिहल्या गेल्या होत्या, परंतु रेखाने यावर अजिबात काही प्रतिक्रिया दिली नाही.


Leave A Reply

Your email address will not be published.