Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

अक्षय कुमारच्या आगामी ‘गोरखा’ चि्त्रपटाच्या पोस्टरवर चुकीचे हत्यार पाहून भडकले माजी सैन्य अधिकारी; म्हणाले…

चित्रपटसृष्टीतील कलाकार नेहमीच त्यांच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत असतात. यासोबतच ते चित्रपटाशी संबंधित चुकांमुळेही चर्चेचा विषय ठरत असतात. आता असेच काहीसे सुपरस्टार अक्षय कुमारसोबत घडले आहे. अक्षय लवकरच आनंद एल राय यांच्या ‘गोरखा’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तो दिग्गज अधिकारी मेजर ईयान कार्डोजो यांची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाच्या घोषणेसोबतच निर्मात्यांनी चित्रपटाचे पोस्टरही जाहीर केले आहे. पोस्टर समोर येताच एका माजी सैन्य अधिकाऱ्याने या पोस्टरमधील चूक दाखवून दिली आहे. त्या अधिकाऱ्याने खडसावल्यानंतर अक्षयने त्यांना धन्यवाद दिला आहे.

निवृत्त अधिकारी माणिक जॉली यांनी ट्विटरमार्फत चुकीची खुकरी (एकप्रकारचं धारधार शस्त्र) वापरल्याची माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले की, “प्रिय अक्षय कुमार जी, एक माजी गोरखा अधिकारी असल्याच्या नात्याने मी तुम्हाला हा चित्रपट बनवण्यासाठी धन्यवाद देऊ इच्छितो. तरीही गोष्टींचा तपशील महत्त्वाचा असतो. कृपया योग्य खुकरीचा वापर करा. ज्याच्या दुसऱ्या बाजूला धार असते. ही तलवार नाहीये. खुकरी आतील बाजूस वाकलेली असते. उदाहरणासाठी फोटो टाकत आहे.” (Retired Army Officer Furious For Showing Wrong Weapon In The Poster of Gorkha Film)

या ट्वीटला उत्तर देत अक्षयनेही ट्वीट केले आहे. तो आपल्या ट्वीटमध्ये लिहितो की, “प्रिय मेजर जॉली, चूक सांगण्यासाठी धन्यवाद. आम्ही चित्रीकरणावेळी संपूर्ण सावधगिरी बाळगू. मला गोरखा चित्रपट बनवल्यामुळे खूप अभिमान वाटत आहे. आम्ही कोणत्याही अशा सल्ल्याची प्रशंसा करतो, ज्यामुळे चित्रपट खराखुरा दाखवण्यासाठी मदत मिळेल.”

अक्षय कुमारच्या ‘गोरखा’पूर्वी माणिक जॉली यांनी सॅम बहादूर यांच्या चित्रपटाच्या पोस्टरमधीलही चूक सांगितली आहे. पोस्टरमध्ये विक्की कौशल चुकीच्या बॅचसोबत दिसत होता. माणिक यांनी लिहिले होते की, “हे एक गोरखा अधिकारी आहे, जे काळे बॅच परिधान करतात, सोनेरी नाही. हे कमीत कमी आहे, जी आम्ही निर्मात्यांशी अपेक्षा ठेवू शकतो. अशाप्रकारच्या दिग्गज सैन्य अधिकाऱ्याचा गणवेश बरोबर करा.”

खरं तर, अक्षयने आपल्या ‘गोरखा’ चित्रपटाचे पोस्टर शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) प्रदर्शित केले होते. यामध्ये गोरखा अधिकारी बनलेल्या अक्षयचा लूक शानदार दिसत होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मस्तच! सबाने शेअर केला शर्मिला अन् मन्सूर अली यांच्या साखरपुड्याचा फोटो, चाहते म्हणाले…

-काय सांगता! ‘द फ्लॅश’मध्ये पाहायला मिळणार दोन व्हर्जन; इझरा मिलरचा ‘डीसी फँडम’मध्ये खुलासा

-पत्नीची प्रेग्नेंसी नाही, तर ‘हे’ आहे शो बंद करण्यामागचं खरं कारण; कपिल शर्माचा मोठा खुलासा

हे देखील वाचा