×

‘आता जगायला शिकले’, म्हणत रिया चक्रवर्तीने शेअर केले तिचे इंडो वेस्टर्न लूकमधील सुंदर फोटो

बॉलिवूड अभिनेत्री असलेल्या रिया चक्रवर्तीला अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर मोठ्या संकटाना तोंड द्यावे लागले. तिलाच सुशांतच्या मृत्यूसाठी जबाबदार धरले जात होते. एवढचं काय तर तिला काही दिवस जेलची हवा देखील खावी लागली होती. अं’मली पदार्थांमध्ये नाव आल्यानंतर तिची खूपच बदनामी झाली. सोशल मीडियावरही तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले गेले. त्यामुळे मधला काही काळ ती सोशल मीडियापासून लांब होती. मात्र आता ती पुन्हा सोशल मीडियावर परतली असून, चांगलीच सक्रिय झाली आहे. अनेकदा रियाला वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये पाहिले जाते. नुकतेच रियाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे काही सुंदर फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये रिया कमाल दिसत असून, तिच्या फॅन्सला तिचे हे फोटो खूपच आवडत आहे.

नुकतीच रिया अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांच्या लग्नात सामील झाली होती. या समारंभात रिया तिच्या जुन्या अवतारात दिसली. रियाने फरहान आणि शिबानीच्या हळदीच्या कार्यक्रमातील तिचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये तिच्या पारंपरिक लूक दिसत असून, त्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. तिचे हे शेअर केलेले फोटो इंटरनेटवर चांगलेच व्हायरल होत आहे.

या फोटोंमध्ये रियाने पिवळ्या रंगाचा इंडो वेस्टर्न लेहेंगा घातला असून, त्यासोबत मॅचिंग श्रग देखील घातलेला दिसत आहे. या ड्रेससोबत रियाने हेव्ही कानातले आणि हातात एक स्टायलिस्ट कडा घातलेला दिसत असून, या लूकमध्ये ती खूपच आकर्षक दिसत आहे. या फोटोंमध्ये रिया वेगवेगळ्या पोझ देताना दिसत असून हे फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले, “केव्हा ना केव्हा, कुठे ना कुठे तिने शेवटी शिकून घेतले की कसे जगायचे आहे.”

सुशांतच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी रिया तिच्या कामावर परतली असून, काही दिवसांपूर्वी तिने तिचा एक फोटो शेअर केला होता ज्यात ती व्हॉइस रेकॉर्ड करताना दिसली. हा फोटो शेअर करताना तिने तिच्या कठीण काळात तिला पाठिंबा देणाऱ्यांचे आभार मानले होते. रियाने ‘तुनीगा-तुनीगा’ या तामिळ सिनेमातून अभिनीत पदार्पण केले तर, ‘मेरे डॅड की मारुती’मधून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.

हेही वाचा –

बुरखा घालून चित्रपट पाहायला गेलेल्या माधुरी दीक्षितला ‘या’ कारणामुळे अर्धवट चित्रपट सोडत काढावा लागला होता पळ

Latest Post