Thursday, November 21, 2024
Home कॅलेंडर बॉलीवूडची गुणी कलाकार रिचा चढ्ढाने गॉडफादरशिवाय कशी गाठली यशाची शिखरे? वाचा प्रेरणादायी स्टोरी

बॉलीवूडची गुणी कलाकार रिचा चढ्ढाने गॉडफादरशिवाय कशी गाठली यशाची शिखरे? वाचा प्रेरणादायी स्टोरी

बॉलिवूडमध्ये कोणत्याही गॉडफादरशिवाय जसं प्रवेश मिळवणं अवघड तसच एकदा प्रवेश झाल्यावर कामात सातत्य टिकवणं त्याहूनही अवघड! प्रत्येक क्षणाला कलाकाराला इथे एक वेगळ्याच कसोटीला सामोरं जावं लागतं. जे या कसोटीला सचोटीने सामोरे जातात तेच कलाकार बॉलिवूडमध्ये यश मिळवतात. ज्या गुणी कलाकाराविषयी आपण बोलणार आहोत तीच नाव आहे रिचा चड्ढा!

बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा तिचा 37वा वाढदिवस साजरा करत आहे ‘फुकरे’ या चित्रपटात साध्या भोळ्या पंजाबी मुलीची भूमिका साकारणारी रिचा चड्ढा खऱ्या आयुष्यात मात्र एक पंजाबी कुडी आहे. कलाकाराला आपण जे नसतो अशा भूमिका साकारणं एखादेवेळी सोपं जाईल परंतु आपण जे असतो ती भूमिका साकारण आणि ती नवख्या पद्धतीने साकारणं हे महा कठीण काम असतं. 18डिसेंबर 1986 रोजी पंजाबच्या अमृतसर येथे जन्मलेल्या रिचाचे वडील एका मॅनेजमेंट फर्मचे मालक आहेत आणि तिची आई दिल्ली विद्यापीठात प्राध्यापिका आहे.

रिचा चड्ढा हिने तिचं सुरुवातीचं शिक्षण दिल्ली येथे घेतलं. कलांतराने मॉडेल म्हणून तिने पदार्पण केलं परंतु त्यानंतर तिने नाटकात काम करायला सुरुवात केली. रिचा पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर दिबाकर बॅनर्जी यांच्या ‘ओए लकी लकी ओय’ या चित्रपटामार्फत दिसली होती. या चित्रपटात तिने छोटीशी भूमिका साकारली होती.2008 मध्ये आलेल्या या चित्रपटानंतर ती 2010 मध्ये आलेल्या बेनी आणि बबलू या चित्रपटात पुन्हा एकदा छोट्या भूमिकेत दिसली होती.

गँग्स ऑफ वासेपुरपूर (भाग -1) चित्रपटात रिचा पहिल्यांदा मुख्य भूमिकेत दिसली होती. अनुराग कश्यप दिग्दर्शित हा चित्रपट प्रचंड गाजला आणि चित्रपटात नगमा खातूनची भूमिका साकारल्याबद्दल रिचाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर समीक्षकांचा पुरस्कार मिळाला. पुढे याच चित्रपटाच्या दुसर्‍या भागात देखील रिचा दिसली. कालांतराने फुकरे आणि मग मसान या चित्रपटाच्या माध्यमातून ती पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर मुख्य भूमिकेत झळकली. तिचे हे सर्व सिनेमे सलग यशस्वी ठरले आणि आणि ऋचा चड्ढा बॉलिवूडमध्ये नावारूपास आली.

 ‘शकीला’ या चित्रपटात रिचा आपल्याला मुख्य भूमिका साकारताना दिसली. या चित्रपटात ती दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील शकीला या यशस्वी अभिनेत्रीची भूमिका साकारताना दिसला. जीची कथा एका पॉर्न स्टारपासून सुपरस्टार अभिनेत्री होण्यापर्यंत जाते. रिचा सोबतच पंकज त्रिपाठी यांनी देखील या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. हा सिनेमा 25 डिसेंबरला म्हणजेच नाताळच्या दिवशी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.

हेही वाचा-
Gautami Patil: ‘घोटाळा झाला’ने केल मार्केट जाम; गौतमीच्या नव्या गाण्याची तरुणांना भुरळ
‘दृश्यम’ फेम इशिता दत्ताने केले ग्लॅमरस फोटोशूट, एकदा पाहाच

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा