Friday, November 22, 2024
Home बॉलीवूड ऋचा चढ्ढाने प्रेग्नेंसीचे फोटो केले शेअर, पण ‘या’ कारणामुळे कमेंट सेक्शन केले बंद

ऋचा चढ्ढाने प्रेग्नेंसीचे फोटो केले शेअर, पण ‘या’ कारणामुळे कमेंट सेक्शन केले बंद

अभिनेत्री रिचा चढ्ढा (Richa Chadda) लवकरच आई होणार आहे, त्यामुळे ती चर्चेत आहे. अलीकडेच तिने तिच्या सोशल मीडिया हँडलवर तिच्या गरोदरपणाचा एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये तिचा नवरा अली फजल देखील दिसत होता. या पोस्टमधील एक वेगळी गोष्ट म्हणजे रिचाने आपला कमेंट सेक्शन बंद केला.

रिचा चड्ढाने कमेंट सेक्शन का बंद केले हे गुपित नाही. याचे कारण त्यांनी स्वतःच दिले आहे. तिच्या पोस्टच्या शेवटी, रिचाने लिहिले आहे की कमेंट सेक्शन बंद केले आहे, कारण ही मी पोस्ट केलेली सर्वात वैयक्तिक गोष्ट आहे. साहजिकच रिचाला तिच्या या खास भावनेबद्दल कोणतीही नकारात्मक प्रतिक्रिया नको आहे.

या पोस्टसोबत ऋचाने भावनिक कॅप्शनही लिहिले आहे. तिने लिहिले की असे शुद्ध प्रेम जगाला प्रकाशाच्या किरणांशिवाय काय आणू शकते? या अविश्वसनीय प्रवासात माझा सोबती असल्याबद्दल अली फजलचे आभार. रिचानेही रिद बर्मनला या फोटोशूटसाठी बोलावल्याबद्दल आभार मानले. रिचा चढ्ढा आणि अली फजल ऑगस्टमध्ये आई-वडील होणार आहेत. हे त्यांचे पहिले अपत्य असेल.

ऋचा चड्ढा अखेरची संजय लीला भन्साळी यांच्या ‘हिरामंडी’ या डेब्यू वेब सीरिजमध्ये अभिनय करताना दिसली होती आणि तिचा पती अली फजल सध्या मिर्झापूर या वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनमुळे चर्चेत आहे. नवीन सीझन 5 जुलैपासून Amazon Prime Video वर स्ट्रिम होत आहे. यामध्ये अली फजलने गुड्डू पंडितची भूमिका साकारली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘देवदास’मध्ये भन्साळींनी सेट भव्य बनवण्यासाठी खर्च केले अर्धे बजेट! पारोसाठी आणल्या होत्या 600 साड्या
गोविंदाला जेम्स कॅमेरूनचा ‘अवतार’ ऑफर करण्यात आला होता? पहलाज निहलानी यांनी सत्य सांगून केली सारवासारव

हे देखील वाचा