चित्रपट हे समाजाला आरसा दाखवण्याचे काम करतात. चित्रपटांमधून माहिती तर मिळतेच शिवाय काही चित्रपट हे समाज प्रबोधन देखील करण्यास उपयुक्त ठरतात. एक काळ होता जेव्हा चित्रपटात तेच तेच विषय विविध अंगाने दाखवले जात होते. मात्र आजचा काळ खूप वेगळा आहे चित्रपटांमधून प्रेमकथा सोबतच अनेक नवनवीन विषय दाखवले जात आहे. अनेक महान लोकांच्या कार्याचा आढावा चित्रपटांमधून लोकांपर्यंत पोहचवला जात आहे. खेळ, राजकारण, संस्कृती, सामाजिक, अशा अनेक विषयांवर आपल्या देशात चांगले सिनेमे बनत आहे.
नुकताच रिचा चड्ढाच्या ‘मैडम चीफ मिनिस्टर’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. मैं कुंवारी हूं, तेज कटारी हूं, लेकिन सिर्फ तुम्हारी हूं. या दमदार संवादाने रिचाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
राजकारणावर आधारित हा सिनेमा एका दलित मुलीच्या संघर्षावर भाष्य करताना ट्रेलर मधून दिसत आहे. २२ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमात रिचाने एका दलित मुलीची भूमिका साकारली असून खूप संघर्षाने ती मुख्यमंत्री पदापर्यंत जाते. ही मुलगी कोणासमोर वाकतही नाही आणि कोणाला दाबून टाकण्यावर विश्वासही ठेवत नाही. आपल्या हुशारीने, संघर्षाने आणि चांगल्या कामाने लोकांच्या मनात जागा निर्माण करत सत्तेच्या सर्वोच जागी पोहचते.
या सिनेमातून आजही समाजात असणाऱ्या अनेक चुकीच्या चालीरीतींवर प्रकाश टाकण्यात आला असून या कुरितींवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
या सिनेमाचे दिग्दर्शन ‘जॉली एलएलबी’ फेम सुभाष कपूर यांनी केले असून चित्रपटाची कथा देखील त्यांनीच लिहिली आहे. रिचासोबतच या सिनेमात मानव कौल आणि सौरभ शुक्ला यांच्या देखील दमदार भूमिका आहेत.
तीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये रिचा अतिशय कॉन्फडेंट दिसत आहे. कधीही न पाहिलेला तिचा अवतार या सिनेमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या ट्रेलरचा शेवटचा संवादही लक्षात राहण्यासारखा आहे. “तुम्हारी आवाज उठाने से, तुम्हारी सेवा करने से, दुनिया की कोई ताकत नहीं रोक सकती.” रिचाची जबरदस्त भूमिका आणि अभिनय यांमुळे हा ट्रेलर खूप पहिला जात आहे.