नीतू कपूर सूनेला ठेवतील एखाद्या ‘राणीप्रमाणे’; रिद्धिमा कपूरने सांगितले कसे असेल सासू-सूनेचे नाते


बॉलिवूडचे कपूर घराणे हे नेहमीच चर्चेत असते. अनेक व्यावसायिक गोष्टींमुळे किंवा त्यांच्या घरगुती बाबींमुळे कपूर नेहमीच चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनत असतात. रणबीर कपूरच्या होणाऱ्या पत्नीबाबत कपूर कुटुंब खूप उत्साहित आहे. अशातच अभिनेत्री नीतू कपूर यांची मुलगी रिद्धिमा कपूर साहनी हिने तिच्या एका मुलाखतीत सांगितले की, तिची आई कशा प्रकारची सासू बनू शकते. रणबीर कपूरची आई नीतू कपूर या त्याची गर्लफ्रेंड आलिया भट्टसोबत अनेक फोटोत दिसत असतात. सोशल मीडियावर त्यांचे हे फोटो व्हायरल देखील होत असतात. रणबीर आणि आलियाचे चाहते त्यांच्या लग्नाबाबत खूप उत्साहित आहेत. (Riddhima kapoor sahni said Neetu Kapoor will fab mom in low for ranbir kapoor’s wife)

रिद्धिमाने तिच्या एका मुलाखतीत सांगितले की, तिची आई तिच्या सूनेसोबत एका राणीप्रमाणे वागेल. तिने सांगितले की, “आई एक खूप चांगली सासू असणार आहे. एकदम चील्ड आऊट. ती तिच्या सूनेला सगळं काही देईल, पण बदल्यात काही अपेक्षा देखील ठेवणार नाही. ती प्रत्येक गोष्टीत तिचं मत मांडणारी सासू नसेल. ती प्रत्येकाच्या स्पेसला समजते. ती तिच्या सूनेला सन्मान देईल आणि तिची खूप काळजी देखील घेईल. ती अजिबात तिच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करणार नाही. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर ती सूनेला राणीप्रमाणे ठेवेल.”

नीतू कपूर आणि आलिया भट्ट यांचा क्लोज बाँड नेहमीच चाहत्यांना पाहायला मिळतो. त्या दोघी नेहमी एकमेकींच्या इंस्टाग्राम पोस्टवर कमेंट करत असतात. मागच्याच आठवड्यात नीतू कपूर यांच्या वाढदिवसानिमित्त आलिया भट्टने त्यांच्याबाबत एक पोस्ट केली होती. त्यांचा एक जुना फोटो शेअर करून तिने लिहिले होते की, “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. लव्ह यू नीतू कपूर.” या फोटोमध्ये रणबीर, रिद्धिमा आणि तिची मुलगी समारा देखील दिसत होती.

यासोबतच नीतू कपूर यांनी देखील इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूर दिसत होते. हा फोटो शेअर करून त्यांनी लिहिले होते की, “माझी दुनिया.” यावर चाहत्यांनी असा अंदाज लावला होता की, नीतू कपूर या आता आलिया भट्टला त्यांच्या कुटंबाचा एक भाग मानतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नऊ वर्षांपूर्वी विकी कौशलने दिले होते त्याचे पहिले ऑडिशन; आज आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये केली जाते गणना

-आजीच्या निधनाने पुरती तुटली आहे अनन्या पांडे; महिला दिनानिमित्त शेअर केली होती आजीसोबतची शेवटची पोस्ट

-जोर धरू लागलीय फरहान अख्तरनच्या ‘तूफान’ला बॉयकाट करण्याची मागणी; ट्विटरवर ट्रेंड होतोय #boycotttoofaan


Leave A Reply

Your email address will not be published.