Saturday, April 19, 2025
Home मराठी गुलाबी साडीत कमाल दिसतेय रिंकू, अभिनेत्रीच्या पारंपारिक लूकने वाढवले चाहत्यांच्या हृदयाचे ठोके

गुलाबी साडीत कमाल दिसतेय रिंकू, अभिनेत्रीच्या पारंपारिक लूकने वाढवले चाहत्यांच्या हृदयाचे ठोके

सोशल मीडियावर सतत सक्रिय राहणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे, सर्वांची लाडकी ‘आर्ची’. आर्ची अर्थातच अभिनेत्री रिंकू राजगुरू हल्ली इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात वेळ घालवत असते. ती दैनंदिन जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींपासून ते आगामी प्रोजेक्टबद्दल सर्वकाही चाहत्यासोबत शेअर करत असते. अशातच तिने शेअर केलेल्या लेटेस्ट फोटोवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

रिंकूने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. यात रिंकू कमालीची सुंदर दिसत आहे. यात तिने साडी नेसून पारंपारिक लूक केलेला दिसत आहे. तुम्ही पाहू शकता की, तिने यामध्ये गुलाबी आणि हिरव्या रंगाची साडी नेसली आहे. केसांत माळलेल्या गजऱ्यावर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. साडीमधील तिचा हा फोटो चाहत्यांच्याही पसंतीस उतरला आहे. चाहते या फोटोवर कमेंट करून, आपले प्रेम व्यक्त करत आहे. (rinku rajguru looking gorgeous in traditional look)

नेहमी प्रमाणे तिच्या या फोटोलाही नेटकऱ्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. कमेंट करत एका युजरने लिहिले, “एकच नंबर दिसतायेत.” तर दुसऱ्याने लिहिले, “झिंगाट!” आतापर्यंत या फोटोवर ३१ हजाराहून अधिक लाईक्स आले आहेत.

आगामी काळात रिंकू ‘छूमंतर’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात रिंकू राजगुरू सोबत, प्रार्थना बेहरे, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेनाही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत. तसेच रिंकूचा ‘झुंड’ हिंदी चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमिताभ बच्चन अभिनित या चित्रपटात, तिच्यासोबत आकाश ठोसरही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या ‘सिद्धू’ने ५ वर्षे बघितली होती खऱ्या प्रेमाची वाट, वाचा त्याचा जीवनप्रवास

-आहा कडचक ना! सई ताम्हणकरचे गुलाबी रंगाच्या स्टायलिश लूकमधील फोटो पाहून चाहते क्लीन बोल्ड

-श्रुती मराठेकडून व्हिडिओ शेअर, दिवाळीच्या सीझनमध्ये समोर आला अभिनेत्रीचा पारंपारिक साज

हे देखील वाचा