रिंकू म्हणतेय, ‘वेळच सर्वकाही असते’; तिच्या लेटेस्ट पोस्टवर रंगल्या चर्चा


‘सैराट’ फेम रिंकू राजगुरू ही सतत चर्चेत राहणारं व्यक्तिमत्त्व आहे. तिच्या पोस्ट्स दरदिवशी इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. तिचा चाहतावर्ग भलामोठा आहे. इंस्टाग्रामवर तिला साडे चार लाखाहून अधिक युजर्स फॉलोव करतात. हे चाहते तिच्या प्रत्येक फोटोला आणि प्रत्येक व्हिडिओला भरभरून प्रेम देतात. हे कारण आहे की, रिंकूने पोस्ट शेअर करता क्षणीच ती व्हायरल होऊ लागते.

रिंकू इंस्टाग्रामवर अधिक सक्रिय असल्याचे दिसून येते. या ठिकाणी तिने पुन्हा एक फोटो शेअर केला आहे. ही पोस्ट शेअर करत रिंकू वेळेबद्दल काहीतरी बोलताना दिसत आहे. यात तुम्ही पाहू शकता की, रिंकू हातातील घड्याळात पाहत आहे. तसेच, यात तिने निळ्या रंगाचा टॉप आणि काळ्या रंगाची पँट परिधान केलेली दिसत आहे, ज्यात ती खूप सुंदर दिसत आहे.

हा फोटो शेअर करत, रिंकू म्हणतेय की, “वेळच सर्वकाही आहे.” नेहमीप्रमाणे या फोटोलाही नेटकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे. ४ तासांपूर्वी शेअर केलेल्या या फोटोला आतापर्यंत तब्बल ३० हजाराहून अधिक युजर्सने लाईक केलं आहे. (rinku rajguru shared photo and said timing is everything)

रिंकूच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर तिने काही दिवसांपूर्वीच ‘छूमंतर’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. हा आगामी चित्रपट लंडनमध्ये शूट करण्यात आला आहे. या चित्रपटात रिंकू राजगुरूसोबत, प्रार्थना बेहरे, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेनाही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत. तसेच रिंकूचा ‘झुंड’ हिंदी चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमिताभ बच्चन अभिनित या चित्रपटात, तिच्यासोबत आकाश ठोसरही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मैं तो खड़ी थी आस लगाए…’, रितिका श्रोत्रीच्या निरागसतेने नेटकऱ्यांना पाडली भुरळ

-कंगना रणौत करणार इंदिरा गांधींवर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन; म्हणाली, ‘माझ्यापेक्षा इतर कोणीही…’

-सुरेश रैनाला बॉलिवूड कलाकार आवडत नाहीत? आपल्या बायोपिकसाठी या दोन साऊथ कलाकारांची सुचवली त्याने नावे


Leave A Reply

Your email address will not be published.