‘झाडे लावा झाडे जगवा!’, म्हणत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘आर्ची’ने शेअर केला शेतातील थ्रोबॅक व्हिडिओ

rinku rajguru shared video of working in farm on world's environment day


मानव प्राणी निसर्गाला स्वतःची एकट्याची मालमत्ता असल्यासारखे समजतो. वृक्षतोड, जंगल छाटणी, खनिजांसाठी खाणीचे खोदकाम, प्लास्टिकचा अतिवापर, हवा, नद्या, समुद्र यांचे प्रदूषण अशा अनेक गोष्टींनी मानवाने पर्यावरणाचे संतुलन बिघडवले. यामुळे पृथ्वींवरील कितीतरी प्राण्यांच्या, वनस्पतींच्या प्रजाती नष्ट देखील झाल्या आहेत.

पृथ्वीवर वेळी-अवेळी पाऊस, भूकंप, पेटलेले वणवे, अचानक येणारी वादळे याकडे आपण सजगपणे पाहिले पाहिजे. मानवी जीवन कितीही प्रगत झाले तरी ते निसर्गावर अवलंबून आहे. निसर्गाचे संवर्धन हे आपलेच संवर्धन आहे. यामुळेच दरवर्षी ५ जूनला जागतिक पर्यावरण दिन जगभर साजरा केला जातो. त्याला इको डे असेही संबोधले जाते.पर्यावरण दिवस हा मानवाने पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी काहीतरी कृती करण्याचा दिवस आहे.

या दिनानिमित्त अभिनेत्री रिंकू राजगुरूने देखील एक थ्रोबॅक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती शेतात पाहायला मिळाली आहे. एवढेच नव्हे तर ती शेतामध्ये चक्क मिरच्या तोडताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ चाहत्यांकडून खूप पसंत केला जात आहे. तसेच व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “जागतिक पर्यावरण दिन. झाडे लावा झाडे जगवा. आरोग्य वाचवा.”

या थ्रोबॅक व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या चांगल्याच प्रतिक्रिया उमटत आहेत. चाहते तिचे कौतुक करत व्हिडिओखाली कमेंट्स करत आहेत. काही तासातच व्हिडिओवर ९० हजाराहून अधिक व्ह्यूज आलेले पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे, अभिनेता सुयश टिळकने देखील रिंकूच्या या पोस्टला लाईक केले आहे.

रिंकूच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले, तर ती ‘झुंड’ या चित्रपटात, पुन्हा एकदा आकाश ठोसर सोबत दिसणार आहे. या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चनही दिसणार आहेत. तसेच, चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे करत आहेत. याशिवाय तिचा ‘छूमंतर’ हा चित्रपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कोरोना काळात नागरिकांना जागरूक करण्यासाठी ‘खिलाडी’ अक्षय कुमारने केला व्हिडिओ शेअर, सांगितल्या ‘या’ ५ टिप्स

-‘मोटी हो रहीं हूँ क्या मैं?’, कॉफी घ्यायला पोहोचलेल्या राखी सावंतचा व्हिडिओ व्हायरल

-‘डान्स दीवाने’च्या मंचावर शाहरुख खानच्या गाण्यावर थिरकली माधुरी दीक्षित, सोबतच स्पर्धकांनीही दिली साथ


Leave A Reply

Your email address will not be published.