मराठी चित्रपटसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात अगदी कमी वयात केली. काहींना लगेच यश मिळाले, तर काहींना त्या यशासाठी वाट पाहावी लागली. यातीलच एक अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू. (rinku rajguru) रिंकूने वयाच्या १५ व्या वर्षीच चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या एकाच चित्रपटाने तिला यशाच्या शिखरावर नेऊन पोहचवले. रिंकू सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. अशातच तिचे काही फोटो समोर आले आहेत.
रिंकूने तिचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्या फोटोंची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. तिने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये आपण पाहू शकतो की, तिने जांभळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे. तिने या साडीला शोभेल असे सगळे दागिने घातले आहेत. केसात चाफ्याची फुले माळलेली दिसतायेत. तसेच बाकी सगळा या लुकला शोभेल असा साज-शृंगार केला आहे. ज्यात ती कमालीची सुंदर दिसत आहे. ती या साडीत वेगवगेळ्या पोझ देत आहे. या सगळ्यात तिच्या नाकातल्या नथीने मात्र खास लक्ष वेधून घेतले आहे.
View this post on Instagram
हे फोटो शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “उदासियों की इतनी तलब अच्छी नहीं है, मुस्कुराए जनाब ये ज़िंदगी आपकी ही है.” तिच्या चाहत्यांना देखील तिचे हे सोज्वळ रूप खूप आवडले आहे. अनेकजण तिच्या या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. तिचे चाहते या फोटोवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
रिंकूच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने वयाच्या पंधराव्या वर्षी २०१६ मध्ये चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश केला. तिने ‘सैराट’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर शंभर कोटीपेक्षाही जास्त बिजनेस केला होता. तसेच या चित्रपटाचा हिंदीमध्ये ‘धडक’ नावाचा रिमेक देखील झाला आहे. त्यानंतर तिने ‘कागर’ आणि ‘मेकअप’ या चित्रपटात काम केले आहे. काही दिवसांपूर्वी तिचा ‘तिसरा रंग प्रेमाचा’ हा चित्रपट देखील प्रदर्शित झाला आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अभिनेत्री दिया मिर्झा शोकसागरात, प्रिय व्यक्तीचे अपघातात निधन
आक्षेपार्ह वक्तव्यांवर भडकली आलिया भट्ट, मासिक पाळी आणि अंतर्वस्त्रांबद्दल म्हणाली…
राजीव गांधी हत्येतील दोषीसोबत नाचताना दिसले ‘कटप्पा’ अभिनेता सत्यराज, व्हिडिओ व्हायरल