Friday, August 1, 2025
Home मराठी रिंकू राजगुरूची उंच गगनभरारी! नेटफ्लिक्सच्या ‘या’ आगामी चित्रपटात झळकणार अभिनेत्री

रिंकू राजगुरूची उंच गगनभरारी! नेटफ्लिक्सच्या ‘या’ आगामी चित्रपटात झळकणार अभिनेत्री

‘सैराट’ फेम रिंकू राजगुरू ही सतत चर्चेत राहणारं व्यक्तिमत्त्व आहे. तिच्या पोस्ट्स दरदिवशी इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. तिचा चाहतावर्ग भलामोठा आहे. हे चाहते तिच्या प्रत्येक फोटोला आणि प्रत्येक व्हिडिओला भरभरून प्रेम देतात. ‘सैराट’ नंतर रिंकू सिने इंडस्ट्रीमध्ये उंचच उंच भरारी घेताना दिसत आहे. तिच्या खात्यात अनेक प्रोजेक्ट आहेत. यातलाच एक प्रोजेक्ट म्हणजे नेटफ्लिक्सचा ‘अनकही कहानिया’ हा चित्रपट होय.

नुकतीच रिंकूच्या ‘अनकही कहानिया’ या आगामी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. रिंकूने या चित्रपटाचे एक पोस्टर तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलं आहे. हे पोस्टर शेअर करून रिंकूने लिहिलंय की, “या मोठ्या शहरात प्रेम मिळणे सोपी गोष्ट नाही. अशाच प्रेमाच्या ‘अनकही कहानिया’ लवकरच १७ सप्टेंबरला नेटफ्लिक्सवर येतायेत.” (rinku rajguru’s upcoming movie ready to release on netflix soon)

‘अनकही कहानिया’ हा नेटफ्लिक्सचा चित्रपट आहे. जो १७ सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रेमाच्या तीन वेगवेगळ्या कहाण्या प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यातल्याच एका कहाणीमध्ये रिंकू झळकणार आहे. अश्विनी तिवारी, अभिषेक चौबे, साकेत चौधरी यांनी या चित्रपटातील कथांसाठी दिग्दर्शन केले आहे. रिंकू राजगुरूसोबत या चित्रपटात अभिषेक बॅनर्जी, झोया हुसेन, कुणाल कपूर, पालोमी, देलझाद हिवले हे कलाकार महत्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. चित्रपटाच्या वेगवेगळ्या कथेचे दिग्दर्शन अश्विनी तिवारी, अभिषेक चौबे, साकेत चौधरी यांनी केले आहे.

आगामी काळात रिंकू ‘छूमंतर’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात रिंकू राजगुरूसोबत, प्रार्थना बेहरे, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेनाही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत. तसेच रिंकूचा ‘झुंड’ हा हिंदी चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमिताभ बच्चन अभिनित या चित्रपटात, तिच्यासोबत आकाश ठोसरही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘हे’ आहेत अफगाणिस्तान अन् तालिबानवर आधारित आतापर्यंतचे सर्वोत्तम चित्रपट; अजूनही पाहिले नसतील, तर एकदा पाहाच

-शर्मिला टागोरांनी बिकिनी घातल्यामुळे झाला होता मोठा वाद; फोटो पाहून टायगर पतौडींची होती ‘अशी’ प्रतिक्रिया

-प्रतिभावान अभिनेता असूनही रणवीर शोरीच्या वाट्याला आल्या कायम सहाय्यक भूमिका, पण वैयक्तिक आयुष्यामुळे मिळाली जास्त प्रसिद्धी

हे देखील वाचा