Wednesday, July 3, 2024

रिषभ शेट्टीचा ‘कांतारा’ चित्रपटगृहांमध्ये घालतोय धुमाकूळ, 4 नोव्हेंबरला होणार ओटीटीवर रिलीज?

‘कांतारा’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. कांतारा(Kantara) या कन्नड चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यानंतर तो हिंदी, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम भाषेत रिलीज झाला. इथेही चित्रपटाने तितकीच चांगली कामगिरी केली. या चित्रपटाने 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे. दरम्यान, हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होण्याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. पण आता यावर निर्मातानी प्रतिक्रिया दिली आहे.

यादरम्यान, 4 नोव्हेंबरला ‘कंतारा’ चित्रपटाचा ओटीटीवर प्रीमियर येणार आहे. ही बातमी समोर आल्यानंतर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. अशा परिस्थितीत आता निर्माता कार्तिक गौडा(Karthik Gowda) यांनी या अफवांवर प्रतिक्रिया दिली आहे. निर्माता कार्तिक गौडा यांनी एक ट्वीट शेअर करुन कांताराच्या ओटीटी रिलीजबाबत माहिती दिली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे, ‘ही चुकीची बातमी आहे. जेव्हा हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होईल तेव्हा आम्ही तुम्हाला माहिती देऊ. पण हा चित्रपट चार नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे.’

‘कांतारा’ हा चित्रपट 14 ऑक्टोबर रोजी हिंदीमध्येही प्रदर्शित झाला आहे. रिलीज होताच या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. ‘कांतारा’मध्ये अच्युता कुमार, सप्तमी गौडा, प्रमोद शेट्टी आणि किशोर सहाय्यक भूमिकेत दिसले आहेत.

‘कांंतारा’ने मोडला ‘केजीएफ 2’ चा रेकॉर्ड
माध्यमाच्या वृत्तानुसार, दुसऱ्या मंगळवारी या चित्रपटाने 4 कोटींहून अधिक कमाई केली होती, तर यशच्या ‘केजीएफ 2’ चित्रपटाने केवळ 3 कोटींची कमाई केली होती. अशा परिस्थितीत ‘कांतारा’सारख्या छोट्या बजेटच्या चित्रपटाने यशच्या बिग बजेट चित्रपटाचा विक्रमही मोडला. कांताराच्या कथेत पौराणिक कथा आणि अंधश्रद्धेची रंजक कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाशी लोक स्वत:ला जोडू शकत असल्याचे बोलले जात आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अक्षय कुमार आणि रोहित शेट्टीमध्ये का झाली मारामारी? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

अभिनेता नाही तर दिग्दर्शक, रितेश देशमुखचा नवीन चित्रपट वेड लवकरच…

हे देखील वाचा