रितेश पत्नी जेनेलियाला करत होता किस; पण तेवढ्यात झाली कुत्र्याची एन्ट्री, पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट


बॉलिवूडमधील रोमँटिक जोडपं कोण? असा प्रश्न विचारल्यावर आपल्यासमोर अनेक जोडप्यांची नावे समोर येतात. त्यातीलच एक म्हणजे रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख होय. हे जोडपे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. आपल्या चित्रपटांपेक्षा कमी आणि सोशल मीडियावरील व्हिडिओंमुळेच ते अधिक चर्चेत असतात. ते नेहमीच नवनवीन रोमँटिक व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात. त्यांच्या व्हिडिओला चाहत्यांकडूनही भरभरून प्रतिसाद मिळतो. अशातच आता त्यांचा एक नवीन व्हिडिओ व्हायरल होत आहे. मात्र, यामध्ये एक मजेशीर ट्विस्ट पाहायला मिळाला आहे.

रितेशने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत रितेशसोबत त्याची पत्नी जेनेलियाही दिसत आहे. व्हिडिओत दिसते की, बॅकग्राऊंडला अक्षय कुमारचे नवीन ‘फिलहाल २’ गाणे वाजत आहे आणि रितेश जेनेलियाला किस करण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र, जसे तो डोळे बंद करतो आणि कॅमेऱ्याचा अँगल बदलतो, तसे जेनेलियाच्या जागी त्यांचे पाळीव श्वान (कुत्रा) येते. हा व्हिडिओ पाहून कोणीच आपले हसू रोखू शकणार नाही. (Actor Riteish Deshmukh Kissed Wife Genelia Deshmukh But Dog Has Come)

अक्षय कुमारने केले होते आवाहन
खरं तर, अक्षय कुमारचे ‘फिलहाल २’ हे गाणे काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाले आहे. यानंतर अक्षयने एक व्हिडिओ शेअर करून या गाण्यावर चांगले रील व्हिडिओ बनवण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर रितेशनेही या गाण्यावर आपला एक मजेशीर रोमँटिक व्हिडिओ बनवला आहे.

दोन मुलांचे आहेत पालक
रितेश आणि जेनेलियाचे लग्न सन २०१२ मध्ये झाले होते. दोघेही आपल्या वैवाहिक जीवन खूपच आनंदाज जगत आहेत. त्यांना दोन मुले आहेत. त्यांचे नाव रियान आणि राहिल आहे. हे दोघेही आपल्या आई- वडिलांसोबत अनेक व्हिडिओमध्ये दिसतात.

रितेश देशमुखचे चित्रपट
रितेश देशमुखच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले, तर तो लवकरच ‘बच्चन पांडे’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तो अक्षय कुमारसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच रितेश अखेरच्या वेळेस ‘बागी ३’मध्ये दिसला होता.

त्याचवेळी जेनेलियाबद्दल बोलायचे झाले, तर तिने ‘तुझे मेरी कसम से’ या चित्रपटामधून अभिनयाच्या जगात प्रवेश केला होता. यानंतर तिने तेलुगू चित्रपटांमध्येही खूप ओळख मिळविली. बॉलिवूडमध्ये जेनेलियाने ‘जाने तू या जाने ना’ आणि ‘मस्ती’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-खेसारी लाल यादवच्या ‘या’ गाण्यावर अभिनेत्री राणीने लावले जोरदार ठुमके; दिलखेचक अदांना चाहत्यांची पसंती

-पती राज कौशल यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच घराबाहेर दिसली मंदिरा बेदी, आईसोबतचा व्हिडिओ तुफान व्हायरल

-‘…ती सई चोर आहे’, म्हणत मोठ्या बहिणीच्या व्यथा मांडताना दिसली मृण्मयी; सोबतच गौतमीवर लावले तिने गंभीर आरोप


Leave A Reply

Your email address will not be published.