पुष्कर जोगसह ‘या’ चित्रपटात झळकणार रितेश देशमुख, सोशल मीडियावरून अभिनेत्याने दिली माहिती


मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणजेच पुष्कर जोग. अनेक मालिकांमधून तसेच चित्रपटातून त्याने प्रेक्षकांच्या मनात त्याची एक वेगळीच जागा निर्माण केली आहे. पण ‘मराठी बिग बॉस’नंतर तो चांगलाच चर्चेत आला होता. तो मराठी बिग बॉसमध्ये रनरअप विजेता होता. त्याची लोकप्रियता खूप होती. आता पुष्कर मराठी प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आला आहे. ती म्हणजे पुष्कर लवकरच त्याच्या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महत्वाचं म्हणजे या चित्रपटात त्याच्यासोबत एक खास व्यक्ती असणार आहे. याची माहिती त्याने सोशल मीडियावरून दिली आहे.

पुष्कर जोगने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याच्या सोबत रितेश देशमुख आणि मंजरी फडणीस दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये रितेश त्या दोघांचेही कौतुक करताना दिसत आहे. (Riteish Deshmukh will appear in Pushkar jog’ next film adrushy give information on social media)

रितेश म्हणतो की, “हे दोघेही खूप टॅलेंटड कलाकार आहेत. या चित्रपटाचा मी एक भाग असणार आहे, याचा मला खूप आनंद होत आहे.” त्याने केलेले हे कौतुक ऐकून पुष्कर खूप खुश झाला आहे. हा व्हिडिओ शेअर करून पुष्करने लिहिले आहे की, “माझ्या पुढच्या चित्रपटाचा भाग झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. #अदृश्य.”

पुष्कर जोगने दिलेल्या या माहितीवरून चित्रपटाचे नाव तर समोर आले आहे. या चित्रपटात पुष्कर जोग, मंजरी फडणीस आणि ऋतुपर्णा सेनगुप्ता ही बंगाली अभिनेत्री दिसणार आहे. तसेच रितेश देशमुख देखील या चित्रपटाचा भाग असणार आहे. आता हे सगळे कलाकार मिळून नक्की काय धमाल करणार आहेत हे पाहण्यासाठी सगळेच खूप उत्सुक झाले आहेत. या चित्रपटाचे निर्माते अजय सिंग हे असणार आहेत. तसेच कबीर लाल हे या चित्रपटाचे दिग्दर्शक असणार आहेत.

पुष्करने या आधी अनेक चित्रपटात काम केले आहे. त्याने ‘जबरदस्त’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. या चित्रपटात त्याच्यासोबत मानसी नाईक ही मुख्य भूमिकेत होती. त्यानंतर त्याने ‘मिशन पॉसिबल’, ‘फुल टू धमाल’, ‘राजू’, ‘शिखर’, ‘ती ऍंड ती’, ‘वेल डन बेबी’ या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-रितेश अन् सोनाक्षीच्या ‘ककुडा’ चित्रपटाची शूटिंग सुरू, ‘हा’ मराठमोळा निर्माता पहिल्यांदाच करणार हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन

-रात्री उशिरापर्यंत शूटिंग करताना ‘बिग बीं’ची ‘अशी’ झाली अवस्था; म्हणाले, ‘असंच होतं, जेव्हा…’

-पिवळ्या रंगाच्या ब्लेझर सूटमध्ये श्रुती मराठे दिसतेय खूपच आकर्षक, पाहून चुकेल तुमच्याही हृदयाच्या ठोका


Leave A Reply

Your email address will not be published.